बेळगाव लाईव्ह :स्वीमर्स क्लब आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावचा होतकरू जलतरणपटू अमन सुणगार याने भुवनेश्वर, ओडिशा येथे 6 ते 11 ऑगस्ट 2024 या कालावधीत झालेल्या 40 व्या उपकनिष्ठ आणि 50 व्या उपनिष्ठ आणि कनिष्ठ राष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धा -2024 मध्ये कर्नाटक संघासाठी 4X100 मेडले रिले शर्यतीत रोमहर्षक कामगिरीचे प्रदर्शन करत सुवर्ण पदक जिंकले.
अमन सुणगार हा शहरातील प्रतिष्ठित नागरिक अभिजीत सुणगार आणि वसुंधरा सुणगार यांचा मुलगा असून तो सेंट पॉल्स हायस्कूल बेळगाव येथे शिकत आहे.
वरील प्रमाणे राष्ट्रीय स्पर्धेत सुयश मिळवणारा अमन ऑलिम्पिक आकाराच्या सुविधेने सुसज्ज असलेल्या बेळगाव येथील केएलईच्या सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावात पोहण्याचा सराव करतो.
त्याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर आणि विनायक आंबेवाडीकर त्यांचे मार्गदर्शन,
तसेच आई-वडिलांसह डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन, केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर, आणि इतरांचे प्रोत्साहन लाभत आहे.