बेळगाव लाईव्ह : तुरुंगातून फोन द्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देत कोट्यावधींची खंडणी मागणाऱ्या कैद्याला सोमवारी रात्री नागपूर हून विमान द्वारे हिंडलगा जेलला आणण्यात आले.
नागपूर बेळगाव विमानाने अख्तर पाशा यांना बेळगाव विमानतळावरून हिंडलगा कारागृहात रवानागी करण्यात आली.
संशयित दहशतवादी अख्तर पाशा याचे अन्य दहशतवादी संघटनाशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगाव कोर्टात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या जयेश पुजारी याने बेळगावच्या हिंडलगा कारागृहातूनच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून 200 कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिली होती या पार्श्वभूमीवर अख्तर पाशा आणि जयेश पुजारी या दोघांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली आहे.
गेल्या काही दिवसापूर्वीच जयेश पुजारी याची पुन्हा बेळगाव येथील हिंडलगा जेल मध्ये रवानगी केल्यानंतर सोमवारी नागपूर पोलिसांनी संशयित दहशतवादी अख्तर पाशा याची बेळगाव नागपूर विमानातून सोमवारी रात्री हिंडलगा करागृहात रवानगी करण्यात आली.
सोमवारी रात्री मोठ्या पोलीस बंदोबस्तात पोलिसांनी सांबरा विमानतळावरून अख्तरपाशा यांला हिंडलगा जेल कडे नेण्यात आले.