Monday, December 23, 2024

/

बेळगाव महसूलमधील उपतहसीलदार, शिरस्तेदारांच्या बदल्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह :महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार प्रादेशिक आयुक्त कार्यालयाने बेळगाव विभागाच्या महसूल खात्यातील 16 शिरस्तेदार आणि उपतहसीलदार यांच्या बदल्यांचा आदेश बजावला आहे.

यामध्ये बागलकोट, कारवार, हावेरी, गदग, विजयपूर आणि बेळगाव जिल्ह्यातील शिरस्तेदार व उपतहसीलदारांचा समावेश आहे.

बेळगाव प्रादेशिक आयुक्त कार्यालयातील शिरस्तेदार राजशेखर हादीमनी यांची बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली आहे. निपाणी तहसील कार्यालयातील शिरस्तेदार एम. एम. भालदार यांची बेळगाव तहसील कार्यालयात बदली केली आहे.

कित्तूरचे शिरस्तेदार अशोक चन्नबसन्नावर यांची नाडकचेरी हल्ल्याळ येथे, रायबागचे शिरस्तेदार लिंगप्पा माविनकट्टी यांची मुद्देबिहाळ विजापूर येथे, तर यरगट्टीचे शिरस्तेदार एस. बी. कुलकर्णी यांची आहार शिरस्तेदार म्हणून हुबळी येथे बदली झाली आहे.

तसेच मुधोळचे आहार शिरस्तेदार डी. बी. देशपांडे यांची यरगट्टीचे शिरस्तेदार म्हणून नेमणूक झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.