बेळगाव लाईव्ह :हेल्मेट सक्ती, नंबर प्लेट बरोबरच आता कर्नाटक पोलीस प्रशासनाने वाहनांच्या प्रखर प्रकाशझोतांच्या एलईडी हेडलाइट्सच्या विरोधात मोहीम उघडली असून या संदर्भात जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात 8,244 वाहन चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
एकीकडे ही कारवाई करताना पोलीस प्रशासनाने कायद्याचे पालन करणाऱ्या आणि कायदेशीर परवानगी असलेल्या हेडलाइट्सचा वापर करून रस्ता सुरक्षित ठेवणाऱ्या नागरिकांचे कौतुक केले आहे.
वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रखर प्रकाश झोताच्या एलईडी दिव्यांच्या विरोधात पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेअंतर्गत गेल्या 1 ते 7 जुलै या कालावधीत सर्वाधिक 3,354 गुन्हे बेंगलोर शहरात नोंदविले गेले असून सर्वात कमी म्हणजे 11 गुन्हे बेंगलोर जिल्ह्यामध्ये नोंद झाले आहेत. बेळगाव शहरात 1 ते 7 जुलै या कालावधीत अनुक्रमे 2, 11, 3, 14, 16, 19, 7 याप्रकारे एकूण 72 गुन्हे नोंदविले गेले आहेत.
वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रखर प्रकाश झोताच्या एलईडी दिव्यांच्या विरोधात राज्यभरात दाखल झालेले एकूण गुन्हे पुढील प्रमाणे आहेत.
बेंगलोर शहर -3354, म्हैसूर शहर -381, हुबळी धारवाड शहर -165, मंगळूर शहर -325, बेळगाव शहर -72, कलबुर्गी शहर -50, बेंगलोर जिल्हा 11, कोलार -46, के.जी.एफ. -105, तुमकुर 247, रामनगर 99, चिक्कबेळ्ळापूर 18, म्हैसूर जिल्हा -91, मंड्या -60, हासन -105, चामराजनगर -269, कोडगु -193, दक्षिण कन्नड -205, कारवार -263.