Monday, December 30, 2024

/

टोमॅटो झाला अधिक लाल.. गृहिणींच्या बजेटचे मोठे हाल!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : भाजीपाला, कांदा यासह आता टोमॅटोच्या दरानेही उच्चांक गाठला असून टोमॅटोच्या ललित अधिक भर होत दराने शंभरीचा टप्पा गाठला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले असले तरी भाजीपाल्याच्या दरात दिवसेंदिवस होत असलेली वाढ गृहिणींसाठी धक्कादायक ठरत असून महिन्याचे बजेट अर्ध्यावरच येऊन संपत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

गेल्या महिन्याभरात ३० ते ४० रुपयांवरून ५०, ६०, ७० आणि आता थेट १०० रुपये प्रति किलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे. पावसाळ्यामुळे टोमॅटोच्या पुरवठ्यात घट झाली असून, टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. पावसामुळे भाजीपाल्याचा पुरवठा देखील कमी झाला आहे, त्यामुळे भाव वाढतच राहिले आहेत, विशेषत: ज्या ठिकाणी टोमॅटोची लागवड झाली आहे. टोमॅटो काढणीसाठी तयार असलेले टन सडत आहेत. कमी उत्पादनामुळे बाहेरील राज्यांतील जिल्ह्यांतून टोमॅटोचा अत्यंत कमी पुरवठा होत असून भाव वधारले आहेत. अचानक झालेल्या या परिणामामुळे जनता आणि रस्त्यावरील व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. पुढील काही दिवसात टोमॅटोचे दर अधिक वाढण्याची शक्यताही वर्तविली जात असून सर्वसामान्यांच्या खिशाला वाढत्या दरामुळं झळ लागत आहे.

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटोच्या पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाचा कर्नाटक, हिमाचल आणि महाराष्ट्र यांसारख्या टोमॅटो उत्पादक राज्यांमधून जाणाऱ्या ट्रकवर विपरीत परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम टोमॅटोच्या दरावर दिसून येत आहे. आठवडाभरात टोमॅटोचे दर 60 ते 70 रुपयांवर पोहोचले होते. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे टोमॅटो पिकांवरही विपरीत परिणाम झाला असून पावसामुळे टोमॅटो सडत असल्याने पुरवठा साखळीवरही परिणाम होत आहे. अशा स्थितीत कमी पुरवठ्यामुळे दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या बाजारपेठेत १०० रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.