बेळगाव लाईव्ह: धामणे गावात होणाऱ्या चोऱ्या प्रकरणांचा छडा लावत आरोपींना गजाआड करा गावातील भीतीचे वातावरण दूर करा अशी मागणी धामणे ग्रामस्थांनी ग्रामीण पोलीस पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भात ग्रामीण पोलिस स्थानकाचे निरीक्षक हिरेमठ यांना निवेदन देत केली आहे.
धामणे गावात दिवसा ढवळ्या चोरी झाल्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील पंधरा दिवसापूर्वी बाळू चतुर यांच्या घरी मागील दरवाजा तोडून रोख रक्कम लांबवली होती त्या नंतर सुनील बस्तवाडकर यांच्या घरासमोरील दोन मोटारसायकल पेटून देण्यात आल्या होत्या.
या शिवाय 19 जुलै रोजी रोजी पहाटे ग्राम वनचे प्रकाश कमसेट्टी यांचे शट्टर तोडून रोख रक्कम पळवली त्याच दिवशी दुपारी सुनील यळळूरकर यांच्या घरचा पाठीमागील दरवाजा मोडून रोख रकम आणि सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले सर्वांनी चोरी झाल्याची तक्रार ग्रामीण पोलीस स्थानकात नोंदवली आहे अशी माहिती ग्राम पंचायतीने पोलिसांना दिलेल्या निवेदनात दिली आहे.
मागील काही दिवसापूर्वी घरासमोर लावलेल्या दुचाकी देखील जाळण्यात आल्या होत्या त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरटे मोकाट सुटले आहेत की काय अशी चर्चा रंगत आहे यासाठी धामणे ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्यांच्या शिष्टमंडळाने बेळगाव ग्रामीणपोलीस निरीक्षक हिरेमठ यांना भेटून निवेदन सादर केले आहे . गावात जवळपास 8 चोरीच्या घटना घडल्या असून अद्याप एकही चोरट्याला पोलिसांना पकडण्यात अपयश आले आहे असाही आरोप करण्यात आला आहे.
या संदर्भात ग्रामीण पोलीस निरीक्षक 23 रोजी धामणे गावाला भेट देणार असून लवकरच सर्व चोरी प्रकरणांचा तपास करून आरोपींना शोधू असे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्य, पंचमंडळी गावप्रमुख उपस्थित होते.