Saturday, December 21, 2024

/

जागतिक स्पर्धेसाठी ‘या’ ज्येष्ठ क्रीडापटूला आर्थिक मदतीची गरज

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावचे ज्येष्ठ धावपटू आणि संरक्षण दलातील सेवानिवृत्त कर्मचारी 72 वर्षीय देवरमनी यांची स्वीडनमधील गोटेनबर्ग येथे पुढील महिन्यात होणाऱ्या प्रतिष्ठेच्या जागतिक मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारतीय चमूत निवड झाली आहे.

स्वतः सेवानिवृत्त आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास वगैरेचा खर्च मोठा असल्यामुळे देवरमनी यांच्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

स्वीडनमधील गोटेनबर्ग येथे 13 ते 25 ऑगस्ट 24 या कालावधीत जागतिक मास्टर्स ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतील 10 कि.मी. धावणे, 5 कि.मी. धावणे आणि करण्याची शर्यत या क्रीडा प्रकारांमध्ये एस. एल. देवरमनी भाग घेणार आहेत.

क्रीडा क्षेत्राची आवड असणाऱ्या देवरमनी यांनी महाविद्यालयीन जीवनापासून धावण्याच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आजतागायत 400 हून अधिक पदके मिळविली आहेत. आता वयाची सत्तरी ओलांडली तरी धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा त्यांचा उत्साह तसूभर ही कमी न होता पूर्वी इतकाच कायम आहे हे विशेष होय.

विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेऊन देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी केली असून अलीकडेच यासंदर्भात त्यांनी नेपाळ, श्रीलंका आणि दुबई सारख्या देशांना भेट दिली आहे. परिणामी स्थानिक ॲथलेटिक्सच्या जगतात एस. एल. देवरमनी एक आदरणीय व्यक्ती ठरले आहेत.Devarmani

आता गोटेनबर्ग (स्वीडन) येथील स्पर्धेतील त्याच्या सहभागासाठी प्रवास आणि निवास यासह एकूण अंदाजे रु. 3 लाख खर्च येणार आहे. चन्नम्मा नगरमध्ये छोटे किराणा स्टोअर चालवणारे सेवानिवृत्त कर्मचारी देवरमनी यांना या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे.

मास्टर्स ऍथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने त्याला आधीच आमंत्रण दिले आहे. तेंव्हा आता त्याचा स्पर्धेतील सहभाग सुनिश्चित करण्यासाठी तातडीच्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. तरी ज्यांना आर्थिक मदत करून पाठिंबा देण्याची इच्छा आहे त्यांनी एस. एल. देवरमनी खालील खात्यात आपली मदत जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बँक तपशील : खातेदार: श्री. एस.एल. देवरमनी, खाते क्रमांक : 30264101233, बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया, राणी चन्नम्मा नगर शाखा, बेळगाव., फोनपे : सूर्योदय जनरल स्टोअर्स., मोबाईल क्रमांक : 9481323942.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.