बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी (यल्लम्मा) मंदिराने 1 कोटी 96 लाख रुपये देणगी जमा करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
1 एप्रिल ते 20 मे या कालावधीत भाविकांनी दिलेल्या देणगीची मोजणी बुधवारी पूर्ण झाली. त्यात एकूण देणगी रकमेमध्ये ₹1.71 कोटी रोख रक्कम, ₹20.44 लाख किंमतीचे सोन्याचे दागिने आणि ₹4.44 लाख किंमतीचे चांदीचे दागिन्यांचा समावेश आहे.
राज्य सरकारने लागू केलेल्या शक्ती योजनेमुळे ज्यात विशेषतः मोफत बस सेवा आहे त्यामुळे मंदिराला भेट देणाऱ्या महिला भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे इतकी देणगी जमा होऊ शकली असे मंदिर प्रशासनाने म्हटले आहे.
मंदिराचे कार्यकारी अधिकारी एसपी महेश यांनी विक्रमी देणगी आणि भक्तांच्या उदंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.