Saturday, January 4, 2025

/

भय इथले संपत नाही….! खानापूर तालुक्यातील नागरिकांची व्यथा…

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरापासून अवघ्या २५- ३० किलोमीटरवर असणाऱ्या खानापूरमधील नागरिकांचे पावसाळा सुरु झाला कि मोठे हाल होतात. सर्वाधिक वनपरिक्षेत्राने घेरलेल्या या भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होते.

या भागातील नद्यांना आलेल्या पुरामुळे सर्व परिसर जलमय होतो. रस्ते, पथदीप यासारख्या मूलभूत सुविधा अद्याप या भागात पोहोचल्या नाहीत. वनपरिक्षेत्र असल्याने नेहमीच या भागात वन्यप्राण्यांची दहशत असते. तर पावसाळा सुरु झाला कि अनेक गावांचा संपर्क तुटल्याने येथील लोकांना नरकयातना भोगाव्या लागतात. परिणामी येथील जनतेचे झालेले हाल पाहता येथील लोकांना नेहमीच आपला जीव मुठीत धरून राहावे लागते, हे दिसून येते.

मागील आठवड्यात खानापूरमधील आमगाव येथील एका महिलेच्या छातीत अचानक दुखू लागले. यामुळे ग्रामस्थांनी सदर महिलेला खांद्यावर उचलून आणून रुग्णालयात दाखल केले. या भागात रस्तेच उपलब्ध नसल्याने नागरिकांना नेहमीच असे हाल सहन करावे लागतात.Khanapur issue

या घटनेतील महिलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आणि तिचा मृत्यू झाला. हि घटना ताजी असतानाच याच भागातील कृष्णापूर मधील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर सदर व्यक्तीला साकवावरून आणताना गावकऱ्यांना अनेक त्रास सहन करावे लागले.

खानापूरच्या पश्चिमेला गोवा सीमेपासून 20 किलो मिटर अंतरावर वसलेले हे कृष्णापूर गाव. हेम्मडगा पासून 40 कि.मी. दूर असलेल्या या गावात ४० कुटुंबांची वस्ती आहे. मात्र या भागात कोणत्याच मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. रस्ते नसल्याने पावसाळा सुरु झाला कि गावातील नागरिकांना नरकयातना भोगाव्या लागतात. गावातील कुणी व्यक्ती आजारी पडला, दगावला तर आडी शिवाय पर्याय नाही.

या गावातील सदानंद नायक नामक व्यक्तीला याच गावाच्या शेजारी असलेल्या वाळपई गावात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि अखेर अंत्यसंस्कारासाठीही या व्यक्तीला साकवावरून नेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे आडी आणि तिरडीवरचा प्रवास येथील जनतेला नेहमीचाच झाला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.