बेळगाव लाईव्ह :स्मार्ट सिटी-२ योजनेसाठी बेळगावची निवड झाली नुकताच केंद्रीय पथकाने शहरातील विविध विकासकामांची पाहणी केली. स्मार्ट सिटी-२ योजनेसाठी महापालिकेकडून घनकचरा निर्मूलनाशी संबंधित पाच प्रस्ताव देण्यात आले आहेत. या प्रस्तावांची माहिती पथकाकडून देण्यात आली.
या पथकाने सर्वप्रथम अशोकनगरमधील अगरबत्ती प्रकल्पाला भेट देण्यात आली. फुलांच्या निर्माल्यापासून अगरबत्ती बनविण्याच्या या प्रकल्पाचे अनेकदा कौतुक करण्यात आले आहे. केंद्रीय पथकानेही या प्रकल्पाची पाहणी करुन गौरवोद्गार काढले. त्यानंतर खासबागमधील नाईट शेल्टर उपक्रमाची पाहणी करण्यात आली.
शहापूर शाळेत महापालिकेने राबविलेल्या बायोगॅस प्रकल्पाचीही माहिती पथकाने घेतली. तर खासबागमध्ये बंद पडलेल्या वैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्पालाही भेट देऊन माहिती घेतली. तुरमुरी कचरा डेपो प्रकल्पाला भेट देऊन त्या ठिकाणी कोणकोणते उपक्रम राबवण्यात येत आहेत, याबद्दलही जाणून घेतले. स्मार्ट सिटी प्रकल्पातून महापालिकेला
घनकचरा निर्मूलनासाठी १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेकडून घनकचरा निर्मूलनावर काम करण्यास येणार असून यांतर्गत विविध प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. त्याबाबत केंद्रीय पथकाने चर्चा केली.
नईम खिरुवाला या प्रकल्प संचालकांच्या नेतृत्वाखाली चौघांचे पथक बेळगावात विविध कामांची पाहणी करत आहे. आज त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, पर्यावरण विभागाचे अभियंता हणमंत कलादगी, स्मार्ट सिटी योजनेच्या व्यवस्थापकीय संचालिका सय्यदा आफ्रीनबानू बळ्ळारी, अभियंता आदिलखान पठाण, प्रवीणकुमार खिलारे यांच्यासह काही ठिकाणी नगरसेवकही उपस्थित होते.
स्मार्ट सिटी योजनेचे केंद्रीय पथक महापालिका आणि स्मार्ट सिटी योजनेतील कामांची पाहणी करणार आहे. विशेषतः कचरा निर्मूलनाशी संबधित कामांची पाहणी करण्यात येणार आहे.