Saturday, December 28, 2024

/

स्कूल बस उलटल्याने सहा विद्यार्थी जखमी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटल्याने सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले .

गोकाक तालुक्यातील गोकाक पाच्छापूर मार्गावरील मेलीमर्डी क्रॉस येथे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

मावनुर, गोडचीनमलकी आणि मेलमट्टी या गावातील विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस मरडीमठ गावाकडे निघाली होती. बसचे स्टेरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.School bus

बस उलटल्यावर विद्यार्थी घाबरून गेले आणि त्यांनी एकच आकांत केला. अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढून त्यांना धीर दिला. नंतर या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली.

जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी गोकाक येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.