Friday, October 18, 2024

/

पूरव्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज : पालकमंत्री

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र आणि पश्चिम घाटात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सीमावर्ती भागातील धरण, पाणलोट आणि जलाशय क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या नद्या धोक्याच्या पातळीवर येऊन थांबल्या असून या पार्श्वभूमीवर आज जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रायबाग तालुक्यातील विविध भागांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.

यावेळी प्रसारमाध्यमांना माहिती देताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, सध्या सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून पावसाचा ओघ पाहता अजूनही पाण्याचा प्रवाह वाढण्याची शक्यता आहे. संभाव्य पूरपरिस्थिती ओळखून जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना आखल्या असून .पूरग्रस्त भागांची ओळख पटवून तेथील जनतेचे स्थलांतर करण्यात आले आहे. जमखंडी-मिरज राज्य महामार्गावरील कुडची पूल पाण्याखाली गेला असून, पाण्याच्या पातळीतील चढउताराची माहिती मागविण्यात आली.या नंतर त्यांनी जुनी डिगेवाडी येथील पूरस्थितीची पाहणी करून आढावा घेतला.

पश्चिम घाट आणि महाराष्ट्रात वाढलेला पावसाचा जोर लक्षात घेता तीन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग तेथील जलाशयातून झाल्यास जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन समस्या निर्माण होणार आहे. यामुळे सातत्याने या भागावर निगराणी ठेवण्यात येणार आहे.

Satish j flood
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग कुडची पुलावर कृष्णा नदीच्या पुराची पाहणी करताना पालकमंत्री सतीश जारकिहोळी सोबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद

संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे असून पावसाचा वाढता जोर लक्षात घेता बचाव पथक, केअर सेंटरसह आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. काही नागरिक केअर सेंटरमध्ये जाण्यास स्वारस्य दाखवत नसून अधिकारी वर्ग त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जारकीहोळी म्हणाले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना नुकसान भरपाईदाखल घरे बांधण्यासाठी तीन लाख रुपये देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यासोबतच केंद्र सरकारच्या मदतीसोबत इतर योजनांचा लाभही दिला जाणार आहे.

पाच लाख रुपयांची मदत जाहीर केल्यास प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबापर्यंत हि मदत पोहोचू शकणार नाही. त्यामुळे मदतीची रक्कम कमी करून प्रत्येक नुकसानग्रस्त कुटुंबापर्यंत मदत पोहोचवून दिलासा देण्याचा सरकारचा मानस असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.