बेळगाव लाईव्ह:सीमा प्रश्नावर महाराष्ट्र सरकारला आस्था असेल तर सुप्रीम कोर्टात वकील का हजर राहत नाहीत? असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत बेळगाव सीमा प्रश्नावर पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारले आहेत.
सीमा समन्वयक मंत्री असताना एकनाथ शिंदे का बेळगावला गेले नाहीत? चंद्रकांत दादा पाटील देखील बेळगावचे सीमा समन्वयक मंत्री होते ते देखील बेळगावला गेले नाहीत. केवळ सुरक्षेचा कारण देऊन सीमा भागात न जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून सीमा वासियांचे प्रश्न सुटतील का? असा परखड सवाल राऊत यांनी व्यक्त केला आहे.
आमच्यावर सीमा भागात कोर्टात खटले सुरू आहेत कोर्टाची वॉरंट देखील येत आहेत तरीही आम्ही जातो इथून पुढे जाईन असे राऊत पुढे म्हणाले.
संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर बेळगाव कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे यावर सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार आहेत ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान मागील लोकसभा निवडणुकीत कारभार लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवार विरोधात प्रचार केला होता त्याची चर्चा देखील सध्या सीमा भागात सुरू आहे.