बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कायम असून अथणी, हुक्केरी, मुडलगी आणि रामदुर्ग वगळता जिल्ह्यातील उर्वरित सर्व पर्जन्यमापन केंद्रांच्या ठिकाणी पावसाने जुलै महिन्यातील आपली सर्वसामान्य सरासरी ओलांडली आहे.
बेळगावमध्ये सर्वसामान्य 455 मि.मी. पावसाच्या तुलनेत 93.6 मि.मी. जादा म्हणजे 548.6 मि.मी., तर खानापूर मध्ये 756 मि.मी.च्या तुलनेत 949.7 मि.मी म्हणजे तब्बल 193.7 मि.मी. जास्त पाऊस झाला आहे.
गेल्या चार दिवसापासून पाऊस सतत कोसळत असला तरी जिल्ह्यात कांही ठिकाणी पावसाने अद्याप जुलै महिन्यातील आपली सर्वसामान्य सरासरी गाठलेली नाही. अथणी येथे जुलै महिन्यातील सर्वसामान्य सरासरीपेक्षा 13.4 मि.मी., हुक्केरी येथे 1.1 मि.मी., मुडलगी येथे 10.4 मि.मी. आणि रामदुर्ग येथे सर्वसामान्य सरासरीपेक्षा 10.4 मि.मी. इतकी तूट दाखवणारा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात जुलैमधील सर्वसामान्य सरासरीपेक्षा सर्वाधिक 193.7 मि.मी. पाऊस खानापूर तालुक्यात नोंदविला गेला आहे. खानापूर खालोखाल अनुक्रमे कित्तूर (172.2 मि.मी आणि निपाणी (114.4 मि.मी.) यांचा क्रमांक लागतो.
बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी गेल्या 21 ते आज 25 जुलै या पाच दिवसात दररोज पडलेल्या पावसाची मिलिमीटरमध्ये नोंद (अनुक्रमे तालुका मुख्यालय पर्जन्यमापन केंद्र, जुलैमध्ये पडणारा सर्वसामान्य पाऊस, दि. 21, 22, 23, 24, 25 जुलै रोजी पडलेला पाऊस, सर्वसामान्य पाऊस व पडलेला एकूण पाऊस यातील फरक यानुसार) पुढील प्रमाणे आहे.
अथणी एचबीसी : 65, 3.6, 6.6, 4.4, 7.2, 7.4, 51.6, -13.4. बैलहोंगल आयबी : 129, 11.8, 4.4, 5.2, 21.4, 16.8, 162.0, 33.0. बेळगाव आयबी : 455, 40.0, 33.2, 48.0, 62.0, 62.0, 548.6, 93.6. चिक्कोडी : 134, 14.2, 28.0, 28.2, 11.2, 21.5, 223.9, 89.9. गोकाक : 68, 17.4, 15.2, 5.4, 6.1, 9.3, 99.4, 31.4.
हुक्केरी एसएफ : 150, 12.5, 11.7, 9.5, 5.6, 11.5, 148.9, -1.1. कागवाड (शेडबाळ) : 68.5, 7.6, 17.6, 10.4, 10.4, 10.6, 109.7, 41.2. खानापूर : 756, 51.2, 48.0, 51.5, 71.2, 74.3, 949.7, 193.7. कित्तूर : 270, 38.4, 29.4, 48.6, 62.2, 32.8, 442.2, 172.2. मुडलगी : 67, 11.3, 8.2, 1.3, 1.1, 5.2, 56.6, -10.4.
निपाणी आयबी : 201.8, 22.2, 35.6, 37.4, 20.8, 40.6, 316.2, 114.4. रायबाग : 74, 7.8, 9.0, 7.5, 5.5, 2.2, 78.9, 4.9. रामदुर्ग : 64, 2.4, 0.4, 1.2, 6.1, 4.0, 63.2, -0.8. सौंदत्ती : 76, 6.0, 4.2, 2.2, 9.8, 8.6, 120.2, 44.2.