Tuesday, November 19, 2024

/

डीडीपीआय कार्यालयदेखील गळतीच्या विळख्यात!

 belgaum

बेळगाव लाईव्ह: पावसाचा जोर गेल्या आठवड्यापासून वाढला असून बेळगाव शहरासह तालुक्यातदेखील याचा फटका दिसून येत आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी समाधानकारक असला तरी जनजीवन विस्कळीत करणारा ठरत आहे.

पावसाला सुरुवात झाली कि अनेकठिकाणी विविध समस्या डोके वर काढतात. एरव्ही सर्वसामान्य नागरिकांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसलेला तर आपण पाहतोच परंतु आता समस्यांचा मोर्चा शासकीय कार्यालयांकडेही वळला आहे, हे चित्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे.

बेळगावच्या जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय सध्या गळतीच्या विळख्यात अडकले आहे. संपूर्ण कार्यालयात ठिकठिकाणी छताला लागलेल्या गळतीमुळे बादली आणि अनेक गोष्टी ठेवून पाणी साचविण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.

शाळा, वर्गखोल्या यांची दुरवस्था झालेली आजवर आपण अनेकवेळा पाहिले आहे. परंतु आता चक्क शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयातही हि समस्या आढळून आल्याने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभारण्यात येत आहे.

6 फेब्रुवारी 1959 रोजी बेळगावच्या डीडीपीआय ऑफिसची इमारत बांधण्यात आली होती. आजवर बेळगावमधील क्वचितच शासकीय कार्यालयांच्या इमारतीत सुधारणा करण्यात आली आहे. मात्र अद्याप अशी अनेक कार्यालये आहेत जी वर्षानुवर्षे नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत ओशाळलेल्या अवस्थेत प्रतीक्षा करत आहेत.Ddpi

यापैकीच एक असलेले शिक्षणाधिकारी कार्यालय होय. शासकीय कार्यालयाची अशापद्धतीने झालेली दुरवस्था नागरिकांना बुचकळ्यात टाकत असून जिल्ह्यातील शेकडो शाळांचा कारभार पाहणाऱ्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाची शक्य तितक्या लवकर डागडुजी करण्यात येणे गरजेचे आहे.

गेल्या काही महिन्यात शासकीय कार्यालयांमध्ये, शासकीय कार्यालयांच्या आवारात अनेक चित्रविचित्र घटना घडलेल्या निदर्शनात येत आहेत. कधी जादूटोणा, कधी चोरी तर कधी आणखी काय..

अशा घटनांमुळे शासकीय कार्यालये गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली असून आता शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाची हि अवस्था पाहून जनतेतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.