Thursday, December 19, 2024

/

बेळगावला चपराक! ‘वंदे भारत’ आल्या पावली परत?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारने बेळगावमधून वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यासाठी हिरवा कंदील दाखविल्याची सकारात्मक माहिती पुढे आल्याने बेळगावकरांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असतानाच पायाभूत सुविधांअभावी वंदे भारत एक्स्प्रेसचा बेळगावपर्यंत विस्तार करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाने फेटाळला असल्याची माहिती पायाभूत सुविधा मंत्री एम.बी.पाटील यांनी दिली आहे.

विधान परिषदेच्या प्रश्नोत्तराच्या सत्रात काँग्रेस सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या प्रश्नाला एम.बी.पाटील यांनी उत्तर दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे प्रकल्प बेळगावपर्यंत वाढवावा यासाठी रेल्वे विभागाने यापूर्वीच ट्रायल रन केले आहे. मात्र आता मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने प्रकल्पाचा विस्तार होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

यावर प्रकाश हुक्केरी यांनी आम्हाला हि बाब मान्य नसल्याचे सांगत वंदे भारतचा विस्तार बेळगावपर्यंत करण्यासाठी तातडीने पावले उचलण्यात यावीत, वंदे भारतचा विस्तार न केल्यास राज्य सरकारने रेल्वे प्रकल्पासाठी दिलेला पैसा रोखून धरावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, एम. बी. पाटील यांनी बेळगावसाठी प्रकल्पाचे महत्त्व पटवून देत केंद्र सरकारकडे दाद मागण्याचे प्रयत्न सुरूच राहतील, असे आश्वासन दिले.

वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावपर्यंत वाढवण्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी त्याच राज्यातील रेल्वेमंत्र्यांशी पुन्हा संपर्क साधला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावपर्यंत वाढवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे पुन्हा एकदा आवाहन करणार आहोत असेही ते म्हणाले.Vande bharatविद्यमान खासदारांसमोर आव्हान!

दिवंगत खासदार, रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव साठी रेल्वेसेवांचा विकास करण्याच्या मुद्द्यावर आणि सुरेश अंगडी यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मुद्द्यावर त्यांची पत्नी माजी खासदार मंगला अंगडी यांना उमेदवारी देऊन निवडून आणण्यात आले. त्यानंतर पुन्हा तेच मुद्दे पुढे करून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्यात आली. सध्या बेळगावच्या विद्यमान खासदारपदी विराजमान असलेल्या खासदारांनी बेळगावकरांना अनेक आश्वासने दिली आहेत.

निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीत विजयी झाल्यानंतरदेखील त्यांनी बेळगावकरांना विश्वासात घेऊन अनेक आश्वासने दिली आहेत. यामुळे वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावला सुरु करणे हे त्यांच्यासमोरील मोठे आव्हान असून याबाबत आता खासदार कोणते पाऊल उचलणार? त्यांच्या आजवरच्या अनुभवाचा कस बेळगावसाठी लावणार का? याकडे बेळगावकरांचे लक्ष वेधले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.