Thursday, December 26, 2024

/

नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : मावळते जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची तडकाफडकी बेंगळूरूला बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी नियुक्ती झालेले युवा आयएएस अधिकारी मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी सकाळी बेळगाव जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.

गुरुवारी राज्यातील वीस आहेस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या त्यात नितेश पाटील यांचा समावेश होता.  गुरुवारी आदेश आल्यानंतर शुक्रवारी सकाळी मोहम्मद रोशन यांनी पदभार स्वीकारला.

यावेळी नितेश पाटील यांनी मोहम्मद रोशन यांना पदभार हस्तांतरित केला. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, प्रोबेशनरी आयएएस दिनेश कुमार मीना, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी आदी उपस्थित होते.

नितेश पाटील यांनी 5 मे 2022 पासून 4 जुलै 2024 दोन वर्षे एक महिना बेळगावचे डी सी म्हणून सेवा बजावली आहे त्यांची बदली बंगळुरु येथे झाली आहे.

Mohammad Roshan

कोण आहेत मोहम्मद रोशन

2015 बॅचचे आयएएस अधिकारी असलेले मोहम्मद रोशन यांनी याआधी हुबळी हेस्कॉम एम.डी म्हणून कार्य केले आहे. बी टेक आणि फायनान्स मधून एम बी ए केलेले मोहम्मद रोशन यांनी कारवार आणि हावेरी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावली होती.

सार्वजनिक धोरण या विषयावर एम ए केले आहे. त्यांना कन्नड हिंदी तेलगू उर्दू आणि कोकणी भाषा अवगत आहेत. ते मूळचे हैदराबादचे असून डॉक्टर कुटुंबातून आहेत. एम बी ए आणि इंजिनियरिंग करण्याआधी त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हैद्राबाद येथेच पूर्ण झाले आहे.

नागरी सेवेतील त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून प्रेरित होऊन, त्यांनी इंजीनियरिंगच्या चौथ्या वर्षात शिकत असताना आयएएस परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात त्यानी प्रिलिम पास केली असली तरी त्यांना मुख्य परिक्षेत यश मिळाले नव्हते. एमबीए पूर्ण करताना त्यानी युपीएससीचे आणखी दोन प्रयत्न केले त्यात 2014 मध्ये 44 वा क्रमांक मिळवून तिसऱ्या प्रयत्नात यश मिळविले.त्यांच्या पत्नी देखील रेल्वे खात्यात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.