Sunday, January 5, 2025

/

कॅन्टोन्मेंट बंगलो एरियाही मनपाकडे द्या – खा. शेट्टर यांची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी काल बुधवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिकेकडे हस्तांतर करण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. तसेच फक्त नागरी वसाहती हस्तांतरित न करता ‘बंगलो एरिया’ देखील महापालिकेकडे हस्तांतरित करावा आणि याबाबत आपण कॅन्टोन्मेंट बोर्डाला सूचना कराव्यात, अशी मागणी खासदार शेट्टर यांनी संरक्षण मंत्र्यांकडे केली.

बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने आपल्या अखत्यार येथील अधिसूचित नागरिक क्षेत्र ओळखून उर्वरित नागरिक क्षेत्र महापालिकेकडे सोपवावे असा प्रस्ताव तयार केला आहे. अर्थात बाजार परिसर प्रस्तावात मोडून ‘बंगलो एरिया’ला वगळण्यात आले आहे. याबद्दल गेल्या 6 जुलै रोजी झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीला आपण स्वतः उपस्थित राहून अधिकाऱ्यांना जाब विचारला होता.

तथापि अधिकाऱ्यांनी त्यावेळी प्रतिसाद दिला नाही. बैठकीत सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रस्तावामध्ये बदल सुचवला. परंतु बैठकीच्या इतिवृत्तामध्ये याची कुठेही नोंद झाली नाही. प्रस्ताव तयार करताना नागरिकांची बाजू ऐकून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने नागरी वसाहतीस बरोबरच बंगलो एरिया ही महापालिकडे हस्तांतरित करणे गरजेचे आहे अशी भूमिका खासदार शेट्टर यांनी संरक्षण मंत्र्यांसमोर मांडली.

कॅन्टोन्मेंट बोर्डाने तयार केलेल्या प्रस्तावाला नागरिकांचाही तीव्र विरोध असल्याचे त्यांनी सांगितले. आपण केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार प्रस्ताव तयार करण्याची सत्य सूचना बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना देऊ, असे आश्वासन दिले असल्याचे खासदार शेट्टर यांनी कळविले आहे.

कॅन्टोन्मेंटच्या मुद्याबरोबरच बेळगावपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या मुद्द्याकडेही आपण गांभीर्याने लक्ष द्यावे. कारण उत्तर कर्नाटकातील विशेष करून बेळगाव आणि परिसरातील जनता वंदे भारत एक्सप्रेस फक्त हुबळीपर्यंतच का? असा सवाल करत आहे. तेंव्हा सदर रेल्वे सेवा बेळगावपर्यंत ही उपलब्ध व्हावी या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करावेत संरक्षण मंत्रासोबत तुम्ही रेल्वेमंत्र्यांची ही भेट घ्यावी आणि वंद्यावर संदर्भात मागणी करावी अशी मागणी जनता शेट्टर यांच्याकडे करत आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड ची नागरी वसाहत बेंगलो वसाहती मनपात स्थलांतरित करण्याकडे जास्त जोर देण्याऐवजी वंदे भारत एक्सप्रेस बेळगाव पर्यंत पोहोचवण्यासाठी जोर द्यावा अशी चर्चा  मागणी नेटकरी करताहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.