बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील मराठा सेंटरच्या कुस्ती पटूनी आंतरराष्ट्रीय वर स्तरावर कामगिरी करत पदकांची कमाई केली आहे.
बॉईज स्पोर्ट्स कॅडेट विश्वजित मोरे याने जून 2024 मध्ये ओमान जॉर्डन येथे झालेल्या ग्रीको-रोमन गटात 23 वर्षांखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
तर आणखी एका कुस्ती खेळाडू धनराज जामानिक याने ग्रीक रोमन कुस्ती प्रकारात 15 वर्षा खालील गटात थायलंड येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत रौप्य पदाची कमाई केली आहे.दोन्ही खेळाडूंनी यश संपादन करताना उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित करत विश्वसनीय कामगिरी बजावली आहे.
मराठा रेजिमेंट ब्रिगेडियर जॉयदिप मुखर्जी यांनी कॅडेट्स विश्वजित मोरे आणि धनराज जामनिक यांनी दाखवलेल्या कठोर परिश्रमाचे आणि दृढनिश्चयाचे कौतुक केले आहे. ज्या बॉईज स्पोर्ट्स कॅडेट्सनी उत्कृष्टतेसाठी उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेत यश प्रतिबिंबित केले. या यशाने बॉईज स्पोर्ट्स कंपनी, मराठा सेंटर येथे दिलेले उत्कृष्ट मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अधोरेखित झाले आहे.जे या तरुण खेळाडूंच्या कौशल्यांचे पालनपोषण आणि विकास करण्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे.
मराठा रेजिमेंट मधील बॉईज स्पोर्ट्स कंपनी आर्मी रेसलिंग नोड म्हणून काम करते, जी देशभरातील कुस्ती प्रतिभा ओळखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. क्रीडापटू केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करतात याची खात्री करण्यासाठी हे तज्ञ मार्गदर्शन प्रदान करते.
मिशन ऑलिम्पिकमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या यासारख्या कार्यक्रमांमध्ये केलेल्या प्रयत्नांतून क्रीडा प्रतिभेला जोपासण्यासाठी भारतीय लष्कराचे समर्पण दिसून येते. कुशल क्रीडापटू विकसित करून, भारतीय खेळांचे भवितव्य घडवण्यात, जागतिक स्तरावर उत्कृष्टता आणि स्पर्धात्मक भावना वाढवण्यात लष्कराची प्रमुख भूमिका आहे