Monday, November 18, 2024

/

जि. पं अभियंता बन्नूर यांच्या घरावर पुन्हा लोकायुक्तांची धाड

 belgaum

बेळगाव लाईव्ह :उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून बेळगाव जिल्हा पंचायतीचे सहाय्यक कार्यकारी अभियंता महादेव बन्नूर यांच्या घरावर आज गुरुवारी सकाळी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाड टाकून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली.

बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर गावाबाहेरील बन्नूर यांच्या घरावर आज सकाळी अचानक टाकलेल्या धाडीप्रसंगी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी घराच्या संपूर्ण कानाकोपऱ्याची झडती घेतली.

यापूर्वी देखील लोकायुक्त अधिकाऱ्यांनी महादेव बन्नूर यांच्या घरावर धाड टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली असल्याचे कळते.

त्याच अनुषंगाने अधिक कारवाई करताना आज गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा बन्नूर यांच्या घरावर धाड टाकण्यात आली.

लोकायुक्त उपपोलीस प्रमुख भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली आज टाकण्यात आलेल्या धाडीद्वारे कसून तपास केला जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.