बेळगाव लाईव्ह :वैद्यकीय क्षेत्रात एक ऐतिहासिक कामगिरी करताना डॉ. सतीश नेसरी यांनी सिव्हिल हॉस्पिटल बेळगाव येथे 69 वर्षीय पुरुष रुग्णावर दोन्ही गुडघे संपूर्ण बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साहित्याचा वापर असणारी ही ऐतिहासिक शस्त्रक्रिया रोपणासह (इम्प्लांट) केवळ 2.65 लाख रुपये खर्चात पूर्ण झाली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून दोन्ही गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना आणि विकृतीचा त्रास असलेल्या संबंधित रुग्णाने सिव्हिल हॉस्पिटल बेळगाव येथेच शस्त्रक्रिया करण्याचा आग्रह धरला होता.
प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. नेसरी यांनी हे आव्हान स्वीकारले आणि गोल्ड नी इम्प्लांट विथ मेडिअल पिव्होट नी (एमपीके) डिझाइन आणि व्हिटॅमिन ई पॉलीथिलीन (व्हिटॅमिन ई पॉली) या नावाने ओळखले जाणारे नवे प्रगत डिझाइन आणि इम्प्लांट तंत्रज्ञान वापरून शस्त्रक्रिया केली.
कर्नाटकातील आद्य तंत्रज्ञान : डॉ. नेसरी यांनी या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून या विशिष्ट डिझाइनसह केलेली दोन्ही गुडघे (द्विपक्षीय) संपूर्ण बदलण्याची ही शस्त्रक्रिया कर्नाटकातील अशा पद्धतीची पहिलीच शस्त्रक्रिया आहे.
रुग्णाच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी एमपीके डिझाइन आणि व्हीट ई पाॅलीसह गोल्ड नी इम्प्लांट खास इंग्लंड (युके) मधून आयात करण्यात आले होते. त्यानंतर बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डॉ. सतीश नेसरी यांनी त्या 69 वर्षीय पुरुष रुग्णावर दोन्ही गुडघे संपूर्ण बदलण्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली.
मेडिअल पिव्होट नी डिझाईनचे फायदे : एमपीके डिझाइन गुडघ्याच्या सामान्य गतिशस्त्राची (किनेमॅटिक्स) अगदी जवळून नक्कल करते, जे पारंपरिक गुडघा बदलण्याच्या सर्वसाधारण रचनेच्या (डिझाइन) तुलनेत अधिक नैसर्गिक हालचाल प्रदान करते.
हे डिझाइन 17 वर्षात 98 टक्के जगण्याच्या दरासह अपवादात्मक दीर्घायुष्य आणि टिकाऊपणा देते. व्हीट ई पाॅलीच्या जोडणीमुळे झिजण्याचा दर लक्षणीयरीत्या कमी होतो, ज्यामुळे रोपणाचे आयुष्य आणि कार्यक्षमतेत वाढ होते. उत्कृष्ट कार्य आणि गुणवत्ता : गोल्ड नी इम्प्लांटमध्ये व्हीट ई पाॅली आणि मेडिअल पिव्होट नी डिझाइनच्या मागे असलेली आद्य कंपनी बायोराडने गुडघा बदलण्याच्या तंत्रज्ञानामध्ये एक नवीन मानक स्थापित केले आहे. हे नाविन्यपूर्ण डिझाइन नियमित गुडघा बदलण्याच्या डिझाईन्सच्या तुलनेत उत्कृष्ट कार्यात्मक गुणवत्ता देते. ज्यामुळे दीर्घकालीन आराम आणि सुधारित गतिशीलता हवी असणाऱ्या रूग्णांसाठी ही एक पसंतीची निवड बनते.
बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलसाठी मैलाचा दगड : या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणारे कर्नाटकातील पहिले शल्यचिकित्सक होण्याचा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल डॉ. सतीश नेसरी यांनी अभिमान व समाधान व्यक्त केले. केवळ सिव्हिल हॉस्पिटल बेळगावसाठीच नव्हे तर संपूर्ण कर्नाटक राज्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे असे सांगून आमच्या रुग्णांची शक्य तितकी सर्वोत्तम काळजी घेणे हे आमचे ध्येय आहे आणि ही यशस्वी शस्त्रक्रिया वैद्यकीय तंत्रज्ञानातील नवीनतम प्रगतीचा वापर करण्याची आमची वचनबद्धता दर्शवते, असे डॉ. नेसरी यांनी स्पष्ट केले. शस्त्रक्रिया झालेला रुग्ण सध्या बरा होत असून लवकरच त्याची पूर्ण हालचाल पुन्हा होईल अशी अपेक्षा आहे. ही यशस्वी शस्त्रक्रिया बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या क्षमतांवर प्रकाश टाकते आणि वैद्यकीय क्षेत्रातील ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांसाठी एक नवीन मानदंड प्रस्थापित करते.
बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याने कर्नाटकातील ऑर्थोपेडिक काळजीचा भविष्यातील प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. सतीश नेसरी सारख्या कुशल डॉक्टरांमुळे अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञान सतत गुंतवणूक करणारे सिव्हिल हॉस्पिटल गरजू रुग्णांना उच्च दर्जाची, परवडणारी आरोग्यसेवा प्रदान करण्यात आघाडीवर आहे.