बेळगाव लाईव्ह : सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्याने त्याचबरोबर बेळगाव चोर्ला मार्गावरील कुसमळ्ळी गावानजिकचा पूल धोकादायक असल्याने या मार्गावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती.
या आदेशात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बदल केला असून खानापूरहुन जांबोटीकडे जाणारी वाहने सकाळी 6 ते दुपारी 1 पर्यंत तर जांबोटी हून खानापूरकडे येणारी वाहने दुपारी 1 ते रात्री 8 पर्यंत सोडली जाणार आहेत.
गेल्या आठ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. खानापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्याने बेळगाव चोर्ला मार्गावरून जाणार्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती.
हा रस्ता अरुंद असल्याने दोन वाहने एकाच वेळी आल्यास रस्त्याच्या बाजूला घेतलेली वाहने घसरण्याचा धोका आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या आदेशात बदल केला असून खानापूरकडून जांबोटीकडे जाणारी वाहने सकाळी 6 ते 1 पर्यंत आणि जांबोटीहून खानापूरकडे जाणारी वाहने दुपारी 1 ते रात्री 8 पर्यंत ये-जा करू शकतात, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कळविले आहे.