बेळगाव लाईव्ह : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बेळगावच्या हिंडलगाव जेलमधून धमकीचा फोन कॉल केल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेल्याबेळगावच्या हिंडलगा कारागृहात सध्या काय घडतंय हे गूढच आहे. कारागृहातील एक कैदी जखमी होऊन उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे.
सोमवारी कैदी जखमी कसा झाला?कारागृहात कैद्यांमध्ये मारामारी झाली की दोन कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीत कैदी जखमी झाला हे माहीत नाही, मात्र तो पडून जखमी झाल्याचा दावा रुग्णालयात दाखल झालेल्या कैद्याने केला आहे.
कैद्याच्या जबानीवरून पोलिसांना संशय आला अन् बेळगाव ग्रामीण स्थानकाच्या पोलिसांनी याबाबतीत तपास सुरू केला आहे.
बेळगाव तुरुंगात नेमकं काय घडलं? कैदी खरोखरच खाली पडला आणि जखमी झाला की कारागृहात मारामारी झाली याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत.
हिंडलगा कारागृहात नेहमीच मारामारी होत असते. पोलिस अधिकाऱ्यांनी दहा वेळा कारागृहावर छापे टाकले मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही हे विशेष आहे.