बेळगाव लाईव्ह : शहरातील मध्यवर्ती भागातील कोनवाळ गल्ली येथे एका खाजगी रुग्णालयाच्या मागील बाजूचे ड्रेनेज धोकादायक स्थितीत उघडे पडले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील नागरिक या धोकादायक रस्त्यावरून मार्गस्थ होत होते.
परंतु ७ जुलै २०२४ रोजी ‘बेळगाव लाईव्ह’ ने या समस्येवर प्रकाश टाकत ‘तीन वर्षापासून ड्रेनेजचे झाकण उघडेच’! या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते.
बेळगाव शहरात स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी करण्यात आली मात्र अद्याप अनेक ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यास देखील महापालिका प्रशासन अपयशी ठरलेले आहे याचे जिवंत उदाहरण बेळगाव शहरातल्या मध्यवर्ती भागातील कोनवाळ गल्लीचे देता येईल.
महापालिका यंत्रणेने 3 वर्षापूर्वी या ठिकाणीचे ड्रीनेज झाकण काढले होते मात्र याकडे दुर्लक्षच करण्यात आले होते.
स्थानिक नागरिकांनी यावर पर्याय म्हणून फरशी घातली होती मात्र पावसात ही फरशी देखील काढण्यात आल्याने ड्रेनेज उघड्या आणि धोकादायक स्थितीत होते. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ड्रेनेजची दुरुस्ती व्हावी यासाठी शाळकरी मुलांसोबत असलेला झाकण काढलेल्या ड्रेनेजचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते.
या वृत्ताची दखल घेण्यात आली असून सदर ड्रेनेजवर झाकण बसविण्यात आले आहे. प्रशासनाने घेतलेल्या या वृत्ताची दखल पाहून येथील नागरीकातून समाधान व्यक्त होत असून ‘बेळगाव लाईव्ह’चे कौतुकही होत आहे.
हि बातमी देखील वाचा
*तीन वर्षापासून ड्रीनेजचे झाकण उघडेच*