बेळगाव लाईव्ह : केवळ बेळगाव खानापूर कागवाडचं नव्हे तर अन्य तालुक्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे बेळगाव जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी अन्य काही तालुक्यातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुसळधार पावसामुळे गोकाक, मुडलगी, रायबाग, बेळगाव, हुक्केरी तालुक्यांतुन वाहणाऱ्या विविध नद्या ओसंडून वाहात आहेत. याचप्रमाणे अनेक शाळांच्या इमारतींना गळती लागली आहे.
या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव गोकाक, मुडलगी, रायबाग, बेळगाव, हुक्केरी तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना शुक्रवार दि. २६ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.
हा आदेश बेळगाव जिल्ह्यातील शासकीय, सरकारी अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना लागू आहे.
बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सोमवारपासून सुट्टी आहेत त्या शुक्रवार पर्यंत असणार आहेत. पावसाचा जोर या दोन तालुक्यात आणखी वाढल्यास शनिवारी देखील शाळांना सुट्टी दिली जाऊ शकते आणि सोमवारी शाळा सुरू होऊ शकतात अशी माहिती उपलब्ध झाली आहे.