बेळगाव लाईव्ह :स्वतःच्या दोन मुलींना विष पाजून मारणाऱ्या आरोपीला न्यायालयाने पित्याला जन्मठेपेची शिक्षा आणि वीस हजार रुपयांच्या दंड ठोठाविण्यात आला आहे. सहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली असून चंद्रकांत बांदेकर (रा.रामनगर कंग्राळी खुर्द) असे त्याचे नाव आहे.
घरासमोर करणीबाधा करण्यात आल्याने हाच राग मनात धरून जुलै 2021 मध्ये एपीएमसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणार्या रामनगर दुसरा क्रॉस कंग्राळी खुर्द येथे ही घटना उघडकीस आली होती.
घरासमोर काहींनी जादूटोणा केला होता. हा जादूटोणा कोणी केला या रागातून त्याने आपल्या अंजली (वय 8 वर्षे) आणि अनन्य (वय 4 वर्षे) या दोन मुलींचा विष पाजून खून केला होता. त्यामुळे याप्रकरणी त्याची पत्नीने एपीएमसी पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून घेतला.
तत्कालीन पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. न्यायालयाने सर्व साक्षी पुरावे तपासून पाहिल्यानंतर आरोपीवर आरोप सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि वीस हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
योग्य पद्धतीने तपास केल्याने आरोपीला शिक्षा झाली त्यामुळे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी पोलीस अधिकार्यांचे अभिनंदन केले आहे.