Sunday, December 22, 2024

/

बनावट कागदपत्रे तयार करून कोर्टात शिपाई नियुक्ती एकावर गुन्हा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :जिल्हा न्यायालयात शिपाई पदासाठी बनावट कागदपत्रे तयार करून नियुक्ती करून घेतलेल्या एका संशयीताविरोधात मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुलबर्गा जिल्ह्यातील अर्णाकल येथील शशिकांत बंडाप्पा या संशयीता विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
जिल्हा न्यायालयात शिपाई पदासाठी 2023 मध्ये अर्जांचे आवाहन करण्यात आले होते.

त्यानुसार संशयित शशिकांत यांनी बनावट कागदपत्रे बनवून ती दाखल केली होती. या कागदपत्रांबाबत संशय आल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.त्यामध्ये कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आल्यामुळे त्याच्यावर होतात यतीश दिवाकर मंगरशी यांनी मार्केट पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी म्हणून संशयीतास अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.