बेळगाव लाईव्ह :केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच गोव्यात राष्ट्रीय महामार्ग-748 च्या पणजी-बेळगाव विभागाच्या चौपदरीकरणाची घोषणा केली. महामार्गाचा 52 कि.मी. लांबीचा हा विभाग अंदाजे रुपये 4000 कोटींच्या खर्चात विकसित केला जाणार आहे.
अनेक वाचकांनी हा प्रकल्प नवीन आहे का? असा प्रश्न केला. आमच्या तपासणीत असे दिसून आले आहे की एनएच-748 हा महामार्ग आहे जो बेळगावजवळील एनएच-48 च्या जंक्शनपासून सुरू होतो. जो कर्नाटकातील अनमोड येथून जातो आणि गोव्यातील पणजीजवळ एनएच-66 च्या जंक्शनवर समाप्त होतो.
1) बेळगाव-खानापूर विभाग : काम पूर्ण – गणेबैल येथे टोल सक्रिय.
कर्नाटकातील एनएच-4ए च्या बेळगाव-खानापूर विभागाचे (कि.मी. 0.000-कि.मी. 30.800) (डिझाईन चेनेज कि.मी. 0.000 ते कि.मी. 30.000) हायब्रीड ॲन्युइटी मोडवर (पॅकेज I) चौपदरीकरण (4-लेनिंग) मेसर्स अशोका कॉन्सेस लिमिटेडला देण्यात आले. लांबी : 30 कि.मी..
2) खानापूर – अनमोड विभाग : हा सध्याचा अपूर्ण विभाग आहे.
कि.मी. 30+800 ते कि.मी. 70+800 पर्यंत दुपदरी पवेड शोल्डरसह आणि कि.मी. 70+800 ते कर्नाटक /गोवा सीमा कि.मी. 84+120 पर्यंत दुपदरी पवेड शोल्डरशिवाय, मेसर्स दिलीप बिल्डकॉन लिमिटेडला प्रदान करण्यात आला आहे.
बेंगलोरच्या पर्यावरणवाद्यांनी 2019 मध्ये उच्च न्यायालयाकडून मिळविलेल्या स्थगितीमुळे एनएच-4ए च्या दुपदरीकरणाला विलंब झाला होता. तथापि, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) बेळगावी-गोवा महामार्ग एनएच-4ए चे रुंदीकरण करण्यासाठी पूर्व पर्यावरणीय परवानगीची आवश्यकता नव्हती असे नमूद करून कर्नाटक उच्च न्यायालयाने मार्च 2021 मध्ये स्थगिती रद्द केली.
स्थगिती रद्द होऊनही दिलीप बिल्डकॉनने न्यायालयाची स्थगिती आणि कोविड-19 लॉकडाऊनमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीचे कारण देत प्रकल्पातून माघार घेतली.
सध्या गुंजी जवळील या रस्त्याची (खानापूर ते रामनगर) अवस्था बिकट असून बायपासचे अपूर्ण काम आणि नुसत्या खांबांसह 10-20 फूटाचे खड्डे यामुळे सर्व्हिस रोडवर सध्या सुमारे 4 फूट पाणी साचले आहे.
त्यामुळे आता गेल्या 2018 मध्ये रु. 486.78 कोटींच्या प्रारंभिक मूल्यासह हा अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रु. 4000 कोटी मंजूर करण्यात आले आहेत.