Wednesday, January 29, 2025

/

पावसाचा वाढला जोर खानापुरात शाळांना सुट्टी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यात जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे, नदी, नाले तुडुंब भरले असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी, खानापूर तालुक्याच्या शिक्षणाधिकारी राजश्री कुडची यांच्याकडे शाळा कॉलेजना सुट्टी देण्याची मागणी केली होती.

त्यांच्या विनंती वरून शिक्षणाधिकारी राजश्री कुडची, यांनी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी व बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे सुट्टी देण्याबाबत शिफारस केली होती. खानापूर तालुक्यात कोसळत असलेल्या पावसाची परिस्थिती लक्षात घेता, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, खानापूर तालुक्यातील शाळा कॉलेजना शुक्रवार दिनांक 19 व शनिवार दिनांक 20 जुलै, असे दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे.Dc bgm

 belgaum

पावसाचा जोर पुन्हा वाढला: गुरुवारी दिवसभर पावसाने तुफान बॅटिंग केली असून बेळगावचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विविध भागात पावसामुळे अनेक समस्यांनी डोके वर काढले असून शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत झालेल्या कामकाजाचे वाभाडे निघताना पहायला मिळत आहेत. शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. तर तालुक्यातील नद्या नाले ओसंडून वाहात आहेत.

खानापूरसह विविध ठिकाणी असलेल्या ब्रिजवरून पाणी ओसंडून वाहात असल्याने तसेच पावसाचा जोर अधिक वाढल्याने उद्या खानापूर तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. जुलै महिन्याच्या मध्यवतीच सरासरीपेक्षा १०० मिलीमीटर अधिक पाऊस झाल्याची नोंद झाली असून शेतकऱ्यांसाठी हा पाऊस समाधानकारक झाला आहे. यंदाच्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असून समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणी हंगाम साधला आहे.

आतापर्यंत २४ हजार हेक्टर प्रदेशात भातपेरणी तर १९ हजार हेक्टर प्रदेशात ऊस लागवड पूर्ण झाली आहे. गुरुवारी दिवसभर पडलेल्या पावसाने सायंकाळी काही काळ विश्रांती घेतली होती. मात्र रात्री ९ च्या सुमारास पुन्हा पावसाची संततधार सुरु झाली असून हवामान खात्याने बेळगाव जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.