हवामान खात्याच्या अंदाजानुसार बेळगाव जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील निपाणी, चिक्कोडी, कागवाड (शेडबाळ), गोकाक, कित्तूर आणि सौंदत्ती अशा सहा ठिकाणी जुलै महिन्यात आजपर्यंत सर्वसामान्य पावसाच्या तुलनेत सरासरी जादा पावसाची नोंद झाली आहे. तथापि बेळगावमध्ये सर्वसामान्य 455 मि.मी. पावसाच्या तुलनेत यंदा आजपर्यंत 367.6 मि.मी., तर खानापूर मध्ये 756 च्या तुलनेत 752.7 मि.मी इतका कमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील चिक्कोडी येथे येथे जुलैमधील सर्वसामान्य 134 मि.मी.च्या तुलनेत आजपर्यंत 163.0 मि.मी., निपाणी येथे सर्वसामान्य 201.8 मि.मी.च्या तुलनेत 217.4 मि.मी., कागवाड (शेडबाळ) येथे सर्वसामान्य 68.5 मि.मी.च्या तुलनेत 78.3 मि.मी., गोकाक येथे सर्वसामान्य 68 मि.मी.च्या तुलनेत 78.6 मि.मी. कित्तूर येथे सर्वसामान्य 270 मि.मी.च्या तुलनेत 298.1 मि.मी. आणि सौंदत्ती येथे सर्वसामान्य 76 मि.मी.च्या तुलनेत आजपर्यंत 99.6 मि.मी. इतका जास्त पाऊस पडला आहे.
खानापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी तो जुलैमधील सर्वसामान्यपणे पडणाऱ्या पावसापेक्षा थोडा कमीच आहे. खानापूरमध्ये आजपर्यंत 752.7 मि.मी पाऊस झाला असून जो सर्वसामान्य पाऊसच्या (756 मि.मी.) तुलनेत 3.3 मि.मी. कमी आहे. दुसरीकडे सर्वसामान्य सरासरी गाठण्यासाठी बेळगावमध्ये अद्याप 78.4 मि.मी. पाऊस पडणे बाकी आहे.
बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या पर्जन्यमापन केंद्राच्या ठिकाणी गेल्या 18 ते आज 22 जुलै दरम्यान दररोज पडलेल्या पावसाची मिलिमीटरमध्ये नोंद (अनुक्रमे तालुका मुख्यालय पर्जन्यमापन केंद्र, जुलैमध्ये पडणारा सर्वसामान्य पाऊस, दि. 18, 19, 20, 21, 22 जुलै रोजी पडलेला पाऊस, सर्वसामान्य पाऊस व पडलेला एकूण पाऊस यातील फरक यानुसार) पुढील प्रमाणे आहे.
अथणी एचबीसी : 65, 0.0, 0.0, 4.8, 3.6, 6.6, 32.6, -32.4. बैलहोंगल आयबी : 129, 7.6, 12.0, 8.2, 11.8, 4.4, 118.6, -10.4. बेळगाव आयबी : 455, 29.4, 40.2, 26.0, 40.0, 33.2, 376.6, -78.4. चिक्कोडी : 134, 20.5 9.3, 4.6, 14.2, 8.0, 163.0, 29.0. गोकाक : 68, 2.2, 2.1, 4.4, 17.4, 15.2, 78.6, 10.6. हुक्केरी एसएफ : 150, 10.0, 15.0, 9.8, 12.5, 11.7, 122.3, -27.7. कागवाड (शेडबाळ) : 68.5, 7.2, 4.4, 5.6, 7.6, 17.6, 78.3, 9.8.
खानापूर : 756, 48.8, 41.0, 31.0, 51.2, 48.0, 752.6, -3.3. कित्तूर : 270, 34.8, 18.6, 22.3, 38.4, 29.4, 298.1, 28.1. मुडलगी : 67, 0.0, 1.4, 2.0, 11.3, 8.2, 49.0, -18.0. निपाणी आयबी : 201.8, 30.4, 15.0, 13.0, 22.2, 35.6, 217.4, 15.6. रायबाग : 74, 8.0, 3.5, 2.2, 7.8, 9.0, 63.7, -10.3. रामदुर्ग : 64, 0.0, 0.2, 7.0, 2.4, 0.4, 51.9, -12.1. सौंदत्ती : 76, 7.4, 4.6, 10.8, 6.0, 4.2, 99.6, 23.6.