बेळगाव लाईव्ह : आलमट्टी धरणाचे सर्व 26 दरवाजे उघडण्यात आले असून रविवारी 21 रोजी विसर्ग वाढवण्यात येऊन आता 1 लाख 50 हजार क्युसेक करण्यात आला आहे. तर आवक 87,215 क्युसेक असल्याची माहिती जमखंडी उपविभाग अधिकारी श्वेता बेडीकर यांनी दिली.
आलमट्टी धरणाची क्षमता 123.08 टीएमसी व पाणीपातळी 519.60 मीटर असून सध्या धरणात 97 टीएमसी पाणी व पातळी 517 मीटर आहे. या धरणात 4 लाख क्युसेक प्रवाह आल्यास पुराचा धोका निर्माण होतो.
त्याचप्रमाणे जमखंडी तालुक्यातील हिप्परगी 6 टीएमसी क्षमतेच्या धरणात आवक 87111 क्युसेक व विसर्ग 81000 क्युसेक असून पाणीसाठा 3.148 टीएमसी आहे. सध्या धरण 52.46 टक्के भरले आहे. या धरणात 2 लाख 35 हजार क्युसेकहून अधिक प्रवाह आल्यास धोका असून जमखंडी तालुक्यातील मुतूर, तुबची या गावांना सर्वप्रथम धोका संभवतो, अशी माहिती जमखंडी उपविभाग अधिकारी श्वेता बेडीकर यांनी दिली.
बागलकोट जिह्यातील नंदगाव, ढवळेश्वर आदी नदीकाठच्या गावाला जिल्हाधिकारी जानकी के. एम. यांनी भेट देऊन संभाव्य पुराची माहिती जाणून घेतली.