बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाची विद्यार्थिनी मेघना अनिल पवार हिने बॅचलर ऑफ इंजीनियरिंग अँड बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स शाखेमध्ये सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होत विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठामध्ये (व्हीटीयू) पर्यायाने राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
शिवाजीनगर फर्स्ट अँड सेकंड क्रॉस येथील ऑटो रिक्षा चालक अनिल रामचंद्र पवार यांची मेघना ही ज्येष्ठ कन्या आहे. कॅम्प येथील सेंट मेरीज हायस्कूल मधून 2018 मध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या मेघना हिचे पदवी पूर्व द्वितीय वर्षापर्यंतचे शिक्षण जीएसएस पदवी पूर्व महाविद्यालयामध्ये झाले आहे.
त्यानंतर तिने व्हीटीयू विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अंगडी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयाच्या बॅचलर ऑफ इंजीनियरिंग अँड बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स शाखेमध्ये प्रवेश घेतला. नुकताच या शाखेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये शालेय जीवनापासूनच एक हुशार विद्यार्थिनी म्हणून सुपरीचीत असणाऱ्या मेघना पवार हिने सर्व सेमिस्टरमध्ये सर्वोत्तम कामगिरी नोंदवत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अँड डाटा सायन्स शाखेमध्ये व्हीटीयू विद्यापीठात पर्यायाने राज्यामध्ये प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. आज निकाल जाहीर होताच पवार कुटुंबीयांनी मिठाईचे वाटप करून आनंदोत्सव साजरा केला.
आपल्या या यशास आई-वडिलांचे प्रोत्साहन तसेच अंगडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद देशपांडे आणि एचओडी प्रा. सागर बिर्जे यांचे प्रोत्साहन कारणीभूत असल्याचे मेघना हीने बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.
तसेच आता यापुढे आपल्याला डाटा सायन्स क्षेत्रात कारकीर्द घडवाची आहे, अशी इच्छा तिने प्रकट केली. उपरोक्त यशाबद्दल सध्या मेघना पवार हिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. शिवाजीनगर येथील रहिवासी अनिल पवार हे ऑटो रिक्षा चालक आहेत आणि मेघना ही त्यांची मुलगी आहे. एका ऑटो रिक्षा चालकाच्या कन्येने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवल्याने तिचे कौतुक होत आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी शिवाजीनगर भागातील ऑटो रिक्षा चालकाच्या मुलाने बारावी वसायांसप्रथम क्रमांक मिळवला होता आता शिवाजीनगरच्या ऑटो चालकाच्या कन्याने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला आहे.