बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील अरिहंत हॉस्पिटलमध्ये नुकताच एक अवघड व गुंतागंतीची शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णाला महाधमनी व झडप बदली करून जीवदान देण्यात आले.
राजू पांडुरंग पवार (वय 44, रा. मुडशिंगे कोल्हापूर) असे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या रुग्णाचे नाव आहे. राजू पवार यांना स्टॅनफोर्ड टाईप- ए असेंडिंग आयोर्टिक डिसेक्शन आणि गंभीर आयोर्टिक रीगर्गिटेशनचे निदान झाले होते. ज्या स्थितीत तात्काळ शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. महाधमनीची कमान ही एक अत्यंत गंभीर शस्त्रक्रिया आहे. ज्यामुळे बहुतेक रुग्णांचा मृत्यू काही तासांत किंवा दिवसांत होतो. प्रतिगामी विस्तारामुळे होणाऱ्या महाधमनीचा अपुरेपणा हे या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमुख कारण बनते. मात्र डॉ. एम. डी. दीक्षित यांनी धोका पत्करून ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे.
राजू पवार यांना काही दिवसांपासून श्वसनाचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना स्थानिक रुग्णालयात दखल केले. यावेळी त्यांच्या हृदयाची महाधमनी व झडपेचा त्रास असल्याचे निदान झाले आणि डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. यासाठी राजू व पवार कुटुंबीय पुणे व एन मुंबई येथेही मुक्काम ठोकला होता. पण ही गंभीर शस्त्रक्रिया त्याचबरोबर ही एक खर्चिक असल्याने पवार कुटुंबीय विचारात पडले होते. यामुळे पण पवार कुटुंबीय नैराश्येत गेले होते. पण आशेचा किरण व कोणतीही अवघड शस्त्रक्रिया करण्यात प्रसिद्ध असलेले डॉ. एम. डी. दीक्षित यांची भेट घेण्याचे ठरवले.
यांनतर पवारांनी डॉ. दीक्षित यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धोका पत्करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. याला होकार देत पवार कुटुंबीय शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले. यांनतर डॉ. एम. डी. दीक्षित यांनी राजू पवार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन दिले.
डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतत्वाखालील डॉ. अभिषेक जोशी, डॉ. निखिल दीक्षित, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश लोंडे यांनी ही शस्त्रक्रिय केली. हॉस्पिटलचे संचालक अभिनंदन पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून रुग्णाची विचारपूस केली.
अवघड शस्त्रक्रिया-डॉ. दीक्षित जणू समीकरणच
कितीही व कोणतीही अवघड शस्त्रक्रिया म्हटले की आपसुकच डोळ्यासमोर एकच नाव येते. ते म्हणजे डॉ. एम. डी. दीक्षित होय. हृदय शस्त्रक्रिया म्हटले डॉ. दीक्षित असे जणू समीकरणच झाले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आतापर्यंत डॉ. एम. डी. दीक्षित यांनी हजारो लहानांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींची हृदय शस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन सुखकर केले आहे. त्यांनी देश-विदेशातील रुग्णांवरही यशस्वी उपचार केले असून त्यांनी आतापर्यंत 35 हजारहून अधिक रुग्णांची हृदय शस्त्रक्रिया केली आहे. डॉ. एम. डी. दीक्षित यांना रुग्ण व त्यांचे कुटुंबीय वैद्यकीय क्षेत्रातील देवदूत म्हणून संबोधतात. वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव व सर्वोत्कष्ट रुग्णसेवा हे डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या यशाचे गमक आहे.