Monday, December 23, 2024

/

अखेर प्रत्यक्ष तिरडीवरच संपला ‘तिचा’ तिरडी सदृश स्ट्रेचरवरील प्रवास

 belgaum

बेळगाव लाईव्ह:तिरडी सदृश स्ट्रेचरवरून सुरु झालेला प्रवास प्रत्यक्ष तिरडीवरच संपला……. प्रशासकीय उदासीनता आणि नागरी असुविधांचा बळी ठरलेल्या खानापूर तालुक्यातील आमगाव येथील ‘त्या’ महिलेने अखेर काल रात्री उशिरा शेवटचा श्वास घेतला आहे.

दुर्दैवी मयत महिलेचे नाव हर्षदा हरिश्चंद्र घाडी (वय 38, रा. आमगाव) असे आहे. सदर महिलेला गेल्या शुक्रवारी दुपारी अचानक छातीत दुखून चक्कर येऊ लागली. त्यामुळे गावातील नागरिकांनी तिच्यावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वास अडखळत तिला उपचारासाठी खानापूरला घेऊन येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तथापि रस्ता किंवा वाहन नसल्यामुळे तिला घेऊन जायचे कसे? हा प्रश्न होता. अखेर आमगाव शाळेचे कन्नड शिक्षक बाळेकुंद्री यांनी 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधून तिला नदीपलीकडे येण्यास सांगितले. त्यानंतर हर्षदा घाडी हिला लाकडाच्या गावठी स्ट्रेचरवरून तिरडी उचलल्याप्रमाणे उचलून गावातील 20 -25 गावकऱ्यांनी आळीपाळीने तिचे ओझे वहात नदीकाठापर्यंत आणले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून रुग्ण महिलेला प्रथम खानापूर इस्पितळात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती अतिशय गंभीर असल्याने तिला अधिक उपचारासाठी बेळगाव बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल आणि त्यानंतर केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

हर्षदा घाडी हिला ज्या पद्धतीने उपचारासाठी आमगाव येथून आणण्यात आले. त्याची माहिती मिळताच सर्वप्रथम नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलकडे धाव घेऊन रुग्ण हर्षदाची विचारपूस केली आणि तिला धीर दिला. तसेच तिच्यावर व्यवस्थित प्रभावी उपचार व्हावेत यासाठी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनंती करून आवश्यक सूचना केल्या.

एवढे करून न थांबता डॉ. सरनोबत यांनी घाडी कुटुंबीयांना हर्षदा वरील उपचारासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दरम्यान खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी देखील रुग्ण महिलेची भेट घेऊन तिच्या तिला व तिच्या कुटुंबीयांना धीर दिला. याखेरीज अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधींसह राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी रुग्ण महिला व तिच्या कुटुंबियांची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले.

लाकडी स्ट्रेचर वरून रुग्ण हर्षदा घाडी हिला गावकऱ्यांनी सुमारे 5 कि.मी. अंतराची पायपीट करून दवाखान्यात दाखल केले. याबाबतचे व्हिडिओ सहित वृत्त सोशल मीडिया त्याचप्रमाणे विविध प्रसार माध्यमातून प्रसिद्ध होताच प्रशासनाला देखील खडबडून जाग आली.Aamgav women

या घटनेनंतर बेंगलोर मुक्कामी वनमंत्री ईश्वर खांडरे, बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर आदींची विशेष बैठकी झाली. गेल्या शनिवारी 20 जुलै रोजी दवाखान्याचा खर्च परवडणारा नसल्याने, तिच्या कुटुंबीयांनी तिला घरी वापस आणण्याचा निर्णय घेतला होता. परंतु खासदार विश्वेश्वर हेगडे कागिरी यांनी हॉस्पिटलच्या संचालकांना फोन करून तिच्या खर्चाची जबाबदारी घेतल्याने तिला पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने देखील याविषयी भूमिका मांडली होत

मात्र हे सर्व घडत असताना दुर्दैवाने काल बुधवारी रात्री उपचाराचा फायदा न होता केएलई हॉस्पिटलमध्ये हर्षदा हरिश्चंद्र घाडी हिचे निधन झाले. नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला असुन, अंत्यविधीसाठी मृतदेह आमगाव येथे आणण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.