बेळगाव लाईव्ह: बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज मंगळवारी दुपारी 21 फेऱ्यांमध्ये पार पडली. बेळगाव लोकसभेसाठी यावेळी एकूण 13,65,860 इतके मतदान झाले असून यामध्ये 5,656 इतक्या नोटा मतांचा समावेश आहे. मतमोजणीत प्रारंभापासूनच आघाडी राखत भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर यांना पराभूत करून तब्बल 1 लाख 77 हजार इतक्या मतं फरकाने विजय संपादन केला आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज मंगळवारी दुपारी 21 फेऱ्यांमध्ये पार पडली. ज्यामध्ये प्रारंभापासूनच आघाडी राखत भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी आपले नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर यांना पराभूत करून तब्बल 1 लाख 77 हजार इतक्या मतं फरकाने विजय संपादन केला आहे. सदर निवडणुकीत एकूण 5,656 मतदारांनी सर्व उमेदवारांकडे पाठ फिरवून नोटा मतदान केले आहे.
बेळगाव लोकसभेच्या जागेसाठी यावेळी भाजपचे जगदीश शेट्टर, काँग्रेसचे मृणाल आर. हेब्बाळकर, महाराष्ट्र एकीकरण समितीचे महादेव पाटील यांच्यासह एकूण 13 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सदर निवडणुकीची मतमोजणी 21 फेऱ्यांमध्ये पार पडली. त्यामध्ये पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत विजयी उमेदवार भाजपचे जगदीश शेट्टर आणि पराभूत उमेदवार काँग्रेसचे मृणाल आर. हेंबाळकर यांच्यासह इतर 11 उमेदवारांना पडलेली मते (अनुक्रमे उमेदवाराचे नांव, प्रत्येक फेरीमध्ये पडलेली मते व एकूण मते यानुसार) पुढील प्रमाणे आहेत. (1) जगदीश शेट्टर : 41005, 44212, 39731, 41572, 45718, 39664, 39819, 3737, 42340, 35750, 38967, 37312, 43114, 41165, 36775, 44179, 32711, 31829, 17295, 16626, 3428, एकूण -750949.
(2) मृणाल आर. हेब्बाळकर : 31625, 29544, 28733, 29523, 28563, 32678, 36690, 38093, 31552, 33112, 30026, 32000, 29418, 35141, 28890, 29275, 24980, 20052, 12872, 10873, 3579, एकूण -577219.
(3) महादेव पाटील : 382, 532, 373, 458, 487, 597, 696, 609, 934, 485, 460, 268, 273, 442, 537, 638, 518, 484, 181, 46, 11 एकूण -9411.
(4) अशोक अप्पया अप्पूगोळ : 250, 210, 216, 229, 218, 250, 247, 206, 224, 216, 226, 226, 210, 262, 225, 221, 192, 183, 105, 133, एकूण -4302.
को
(5) बसाप्पा गुरुसिद्धप्पा कुंबार : 313, 302, 274, 324, 301, 307, 261, 284, 307, 286, 265, 252, 250, 294, 289, 304, 229, 195, 99, 172, 50, एकूण -5358.
(6) प्रजाकिया मल्लाप्पा चोगला : 90, 57, 62, 86, 61, 65, 61, 76, 87, 67, 88, 76, 112, 89, 51, 72, 48, 60, 43, 41, 8, एकूण -1400.
(7) लक्ष्मण जडगण्णावर : 121, 76, 68, 69, 58, 62, 71, 70, 73, 67, 70, 66, 55, 71, 55, 76, 45, 42, 32, 37, 7, एकूण -1280.
(8) अश्फाक अहमद उस्ताद : 26, 35, 33, 39, 35, 29, 30, 33, 54, 37, 27, 25, 19, 41, 45, 25, 30, 21, 14, 15, 4, एकूण -617.
(9) अशोक पी. हंजी : 29, 38, 35, 31, 44, 29, 43, 43, 33, 35, 33, 28, 25, 45, 38, 39, 24, 30, 16, 21, 4, एकूण -663.
(10) नितीन अशोक महादगुट : 70, 73, 66, 74, 82, 79, 55, 66, 79, 62, 60, 49, 49, 77, 81, 77, 46, 52, 38, 34, 8, एकूण -1277.
(11) पुंडलिक इटनाळ : 71, 65, 44, 55, 47, 50, 56, 56, 76, 48, 37, 51, 54, 52, 47, 67, 49, 43, 26, 31, 9, एकूण -1054.
(12) रवी पडसलगी : 195, 196, 197, 251, 184, 235, 232, 209, 237, 196, 214, 201, 236, 211, 180, 187, 172, 139, 75, 105, 32, एकूण -3884.
(13) विजय एस. मेत्रानी : 143, 170, 126, 169, 138, 152, 140, 133, 184, 131, 134, 144, 156, 169, 139, 151, 143, 107, 65, 81, 15, एकूण -2790.
नोटा : 341 319 305 377 347 3 00 322 251 297 255 297 270 303 360 286, 309, 214, 235, 127, 106, 31, एकूण -5656. प्रत्येक फेरीअंती झालेली एकूण मतमोजणी : 74660, 75829, 70267, 73247, 76283, 74497, 78723, 77866, 76477, 70747, 70904, 70968, 74274, 78439, 67638, 75640, 59401, 53472, 30988, 28321, 7219, एकूण -1365860.