Monday, October 7, 2024

/

आयसर दुचाकी अपघातात महिला ठार

 belgaum

बेळगाव लाईव्ह: एक्टिवा दुचाकीवरून पडल्यानंतर आईसर गाडीच्या मागील चाकात अडकून झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

बेळगाव खानापूर रोडवरील उद्यमबाग येथील बेमको क्रॉस जवळ बुधवारी सायंकाळी चार वाजता सुमारास हा अपघात घडला आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पल्लवी मदली वय अंदाजे 55 रा. मजगाव असे मयत महिलेचे नाव आहे.Accident

सदर मयत महिला दुचाकीवरून  मजगाव कडून बेळगाव कडे जात होती त्यावेळी एक्टिवा गाडीचा तोल गेल्याने महिला रस्त्यावर पडल्याने आईसर गाडी खाली आल्याने झालेल्या अपघातात महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुचाकी स्वार जखमी झाला आहे.

बेळगाव उद्यमबाग खानापूर रोडवर नेहमी गर्दी असते सायंकाळी चारच्या सुमारास अपघात झाल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. रहदारी दक्षिण पोलिसात अपघाताची नोंद झाली असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.