*प्रदीप अष्टेकर यांची यशस्वी वाटचाल*
( बेळगाव पायोनियर अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन प्रदीप मारुतीराव अष्टेकर यांच्या सहकार क्षेत्रातील कारकीर्दीला एक जून रोजी 25 वर्षे होत आहेत त्यानिमित्त त्यांच्या सहकाऱ्याने घेतलेला त्यांच्या कार्याचा आढावा)
*प्रदीप अष्टीकर एक धाडसी व्यक्तिमत्व. बेळगाव जवळच असलेल्या कुद्रेमनी गावातून बेळगावात आलेल्या प्रदीप अष्टेकर यांचे महाविद्यालयीन शिक्षण ज्योती महाविद्यालयात झाले. तिथून ते कॉमर्सची पदवी घेवून बाहेर पडले.ते राहायचे ठिकाण म्हणजे किल्ला.
किल्ल्यामधील सामाजिक कार्यात कायमच सहभाग. आणि सर्व जाती धर्माच्य लोकांबरोबर सुरुवातीपासूनच चांगले संबंध. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या राजकारणात ओढले गेले. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वार्ड क्रमांक दोन मधून निवडून गेलेल्या प्रदीप अष्टेकर यांनी आपली संपूर्ण कारकीर्द गाजविली.
कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये असलेल्या एकूण सात सदस्या पैकी चार सदस्य मुस्लिम बांधव, एक ख्रिश्चन, एक मागासवर्गीय व एक मराठा. अशी एकंदर परिस्थिती असलेल्या त्या बोर्डात प्रदीप अष्टेकर या आपल्या मराठी माणसाने उपाध्यक्षपदाची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली. हे त्यांच्या खऱ्या यशाचे गमक आहे .त्यांची हे कार्य जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर
कॅन्टोनमेंट बोर्डात काम करत असतानाच बेळगाव येथील सर्वात जुन्या असलेल्या पायोनियर अर्बन बँकेची निवडणूक जाहीर झाली आणि त्यांनी तेथे अर्ज भरला. पहिल्याच निवडणुकीत ते भरघोस मतांनी विजयी झाले आणि त्यांनी पायोनियर बँकेत पावूल टाकले.
आपल्या कर्तृत्ववान आणि धडाडीच्य स्वभावामुळे ते नेहमी यशाची शिखरे पादाक्रांत करत गेले. तिथे कार्य करीत असलेल्या इतर संचालकांचा कार्यपद्धतीचा त्यांनी अभ्यास केला. हे करीत असतानाच त्यांना सहकार खात्याची जे अधिकारी होऊन गेले त्यांनी मोलाचे सहकार्य केले .खास करून जी एम पाटील यांचे त्यांना नेहमीच मार्गदर्शन लाभले. चार वर्षांपूर्वी म्हणजे 2020 साली आम्ही त्यांच्याबरोबर संचालक म्हणून बिनविरोध निवडून गेलो .तेव्हापासून त्यांच्या कार्याची अजून जवळून माहिती घेता आली. त्यांच्या कार्य करण्याची पद्धत ही अद्भुत आहे. आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तीवर त्यांची चांगली छाप पडते. त्याचा ते बारकाईने अभ्यास करतात, त्याच्या अडीअडचणी समजून घेतात आणि म्हणूनच त्यांना यश मिळते. 2020 साली आम्ही सर्वांनी एकमताने त्यांच्यावर चेअरमन पदाची जबाबदारी सोपविली .या वेळेला बँकेत आलेले बहुतेक सर्व संचालक हे सहकार क्षेत्रातील अनुभवी नव्हते तरीही त्यांना बरोबर घेऊन त्यांनी उत्तम प्रकारे कार्य केले आणि म्हणूनच 117 वर्षाची परंपरा असलेल्या या बँकेने गेल्या दोन वर्षात पहिल्यांदाच ठेवीचा शंभर कोटीचा टप्पा पार केला. यंदा तो 200 कोटी करावा अशी सूचना भारतीय रिझर्व बँकेच्या मॅनेजर श्रीमती मीनाक्षी गड यांनी केली होती.
त्यावेळी “मी किमान दीडशे कोटी करेन” असे अभिवचन त्यांनी दिले होते. ते पूर्ण करीत 31 मार्च अखेर 156 कोटीचा टप्पा पार करीत असतानाच दोन कोटीहून अधिक रुपयांचा निवळ नफा करून दिला. हे सर्व अष्टेकर यांच्या दूरदृष्टीकोनाचे व कार्यपद्धतीचे निर्देशक आहे. हे करीत असतानाच कर्मचाऱ्यांच्यासाठी सुरू केलेल्या विविध योजनांचा कर्मचाऱ्यांना चांगला फायदा झाला आहे. बँकेमध्ये संपूर्णतः आधुनिकीकरण करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. सभासदांना अधिकारी चांगली सेवा कशी देता येईल याकडे आमचे सर्वांचेच लक्ष आहे .
अलीकडेच वयाची 75 पूर्ण केलेल्या 80 गुण अधिक सभासदांचा विशेष गौरव समारंभ पूर्वक करण्यात आला.
बँकेला तीन नव्या शाखा काढण्यासाठी परवानगी मिळाली असून येत्या काही दिवसात या तिन्ही शाखा सुरू केल्या जाणार आहेत.
बँकेचा पसारा वाढवित असतानाच दैनंदिन कार्यपद्धतीकडे त्यांचे बारकाईने लक्ष आहे. त्यामुळेच बँकेने ही प्रगती साध्य केली आहे. त्यांच्या या कार्यास आम्ही सर्वजण पाठिंबा देत आहोत आणि याहीपुढे प्रगती अशीच रहाणार आहे. अष्टेकर यांच्या या कारकीर्दीस मानाचा मुजरा.
– *अनंत लाड, चेअरमन बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, पायोनियर अर्बन बँक बेळगाव.*