Friday, December 27, 2024

/

विठ्ठलभक्तांच्या सोयीसाठी रेल्वेसेवेत होणार वाढ

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठलभक्तांसाठी नैऋत्य रेल्वेने अतिरिक्त रेल्वेसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून आजपासून (शनिवार, दि. २९ जून) ०६५०१ क्रमांकाची रेल्वे सायंकाळी ५.३० वाजता बेंगळूरच्या एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलपासून स्थानकावरून निघणार असून पंढरपूर येथे सकाळी ११.३५ मिनिटांनी पोहोचेल.

यादरम्यान या रेल्वेला तुमकूर, गौरीबिदनूर, बनसंद्रा, कित्तूर, अरसीकेरे, बिरुर, चिक्कजारुर, दावणगेरे, हरिहर, राणेबेन्नूर, हावेरी, हुबळी, धारवाड, लोंढा, खानापूर, बेळगाव, गोकाक रोड, घटप्रभा, रायबाग, चिंचली, उगार व मिरज आदी ठिकाणी रेल्वे थांबणार असून एकूण २० डबे एक्स्प्रेसला जोडले जाणार आहेत.

अतिरिक्त रेल्वेसेवेत स्लीपर तसेच एसी डबेही एक्स्प्रेसला दिल्याने विठ्ठलभक्तांचा प्रवास सुखकर होणार आहे. बेंगळूरच्या एम. विश्वेश्वरय्या टर्मिनलपासून पंढरपूरपर्यंत एक्स्प्रेस धावणार आहे.

परतीच्या मार्गावर ३० जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता पंढरपूर येथून निघणार असून दुसऱ्या दिवशी ११.३५ वाजता बेंगळूरला पोहोचणार आहे.रेल्वे क्र. ०६५०५ ही एक्स्प्रेस ३० जून रोजी रात्री १० वा. बेंगळूर येथून निघणार आहे. तर परतीच्या प्रवासात दि. १ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वा. बेंगळूर येथून निघणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.