Thursday, June 20, 2024

/

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ‘त्या’ तरुणाचा मृत्यू

 belgaum

बेळगाव लाईव्ह : पोलीस उपनिरीक्षक आपला छळ करत असल्याचा आरोप करत उत्तरा कन्नड जिल्ह्यातील जोईडा तालुक्यातील पोलीस ठाण्यासमोर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

जोयडा तालुक्यातील रामनगर, हनुमान गल्ली येथील रहिवासी भास्कर बोंडेलकर या व्यक्तीने पोलीस ठाण्यासमोरच आत्महत्येचा प्रयत्न केला. रामनगर पीएसआय बसवराज मगनूर यांनी भास्करविरुद्ध जुगाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. गुरुवारी भास्कर जमिनीच्या वादातून दारू प्राशन करून दुचाकीवरून पोलिस ठाण्यात गेला.

मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या भास्करला दुचाकी पोलीस स्थानकावरच सोडण्याची सूचना पीएसआय बसवराज यांनी केली. मानसिक छळ होत असल्याचे सांगत मद्यधुंद अवस्थेत भास्करने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या भास्करला बेळगावच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.Youth suicide

 belgaum

यापूर्वी भास्करवर जुगार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पीएसआय बसवराजू यांनी त्याचा सतत छळ केला, असा आरोप करण्यात आला. त्यामुळे भास्कराने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी भास्करचे सासरे गणपती यांना जमिनीच्या प्रकरणाबाबत नोटीस बजावली होती.

हे जाणून भास्करने माझ्यावर अत्याचार करणारे पोलीस आता माझ्या सासरच्या मंडळींचाही छळ करत आहेत असा विचार करून पोलीस स्थानक गाठले. मद्यधुंद अवस्थेत गेलेल्या भास्करची आणि पोलिसांची यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली, त्यानंतर भास्करने पेट्रोल ओतून पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.