Friday, January 24, 2025

/

श्रीधर माळगी यांने प्रस्थापित केला नवा आशियाई विक्रम

 belgaum

बेळगाव :सिमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावचा सदस्य होतकरू दिव्यांग जलतरणपटू श्रीधर माळगी याने पराक्रम व दृढनिश्चयाचे आश्चर्यकारक प्रदर्शन करत जलतरणात नवा आशियाई विक्रम प्रस्थापित करण्याद्वारे बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

बर्लिन जर्मनी येथे गेल्या 31 मे ते दोन जून 2024 या कालावधीत आयडीएम बर्लिन वर्ल्ड पॅरा स्विमिंग वर्ल्ड सिरीज -2024 ही जागतिक जलतरण स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.

जगभरातील मातब्बर दिव्यांग जलतरणपटूंचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेतील 800 मी. फ्रीस्टाइल (एस-8 श्रेणी) शर्यतीमध्ये यापूर्वीचा विक्रम मोडीत काढत बेळगावच्या श्रीधर माळगी याने 10:48:85 इतकी वेळ नोंदवून नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला आहे.

मागील विक्रम 5 वर्षांपूर्वी जपानमधील कुबोटा कोटा यांच्या नावावर 10:57:44 इतक्या वेळेसह नोंदविला गेला होता. नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल श्रीधर माळगी याच्यावर सध्या अभिनंदनचा वर्षाव होत आहे.Swimming

बेळगाव येथील सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव (ऑलिम्पिक आकार) येथे श्रीधर त्याचे प्रशिक्षक उमेश कलघटगी सर, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सकाळी आणि संध्याकाळी 3 तास प्रशिक्षण घेतो.

श्रीधरला डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन, केएलई सोसायटी) यांचे महत्त्वपूर्ण समर्थन आणि प्रोत्साहन मिळते. त्याचप्रमाणे जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाऊंडेशन), एसएलके ग्रुप बंगलोर, अलाईड फाउंड्रीज बेळगाव, पॉलिहाइड्रॉन फाउंडेशन, डॉ. नितीन खोत, रो. अविनाश पोतदार, डॉ. राजेंद्र भांडणकर व इतरांचेही प्रोत्साहन लाभत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.