बेळगाव लाईव्ह,: लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उद्या, मंगळवार दि. ३ जून रोजी आरपीडी महाविद्यालय परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी परिपत्रकाद्वारे जाहीर केला आहे.
आरपीडी महाविद्यालयात होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना गैरसोय निर्माण होऊ नये याकरिता या परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टीचा आदेश जाहीर केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार आरपीडी महाविद्यालय परिसरातील एसकेई भंडारी कन्नड आणि मराठी माध्यमिक शाळा, डिव्हाईन प्रोव्हिडन्स इंग्रजी माध्यम, स्वाध्याय विद्यामंदिर, टिळकवाडी हायस्कुल, बालिका आदर्श, केएचपीएस क्रमांक ५ आणि ९, जी.जी. चिटणीस, गोमटेश विद्यापीठाच्या सर्व शाळा,
केएलएस पब्लिक स्कूल, जैन हेरिटेज स्कूल, गोमटेश कॉलेज – हिंदवाडी, केएलएस गोगटे कॉलेज, आर.एल. लॉ कॉलेज, आरपीडी कॉलेज, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी, जैन कॉलेज – हिंदवाडी, प्रेरणा कॉलेज – हिंदवाडी आदी शाळा – महाविद्यालयांना मंगळवार दि. ४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.