बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण विधानसभा संघातून भरघोस मताधिक्क्याने विजयी होऊन दुसऱ्यांदा आपले वर्चस्व प्रस्थपित केलेल्या आमदार, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आपल्या मुलाला काँग्रेसमधून खासदारकीची उमेदवारी मिळवून दिली.
प्रचारादरम्यान धुरळा उडविलेला काँग्रेस पक्ष मतमोजणीत पहिल्याच फेरीपासून पिछाडीवर राहिला. मतमोजणी सुरु असतानाच भाजप उमेदवार जगदीश शेट्टर यांची प्रत्येक फेरीतील आघाडी पाहिल्यानंतर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच मृणाल हेब्बाळकर यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जाणे पसंत केले.
हमी योजना आणि ग्रामीण मतदार संघातील आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे वर्चस्व पाहता ग्रामीण मतदार संघातून मृणाल हेब्बाळकर यांना अधिकाधिक मताधिक्य मिळेल, अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत असतानाच ग्रामीण विधानसभा मतदार संघातून धक्कादायक मतांचा आकडा समोर आला आहे.
ग्रामीण विधानसभा मतदार संघातून मतदारांनी भाजपच्या जगदीश शेट्टर यांना 113495 मते दिली आहेत तर त्याच मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्रीपुत्राला केवळ 67403 मतांवर समाधान मानावे लागले आहे.
ज्या मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित करून खंबीर प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना अधिक मतांची हमी होती, त्याच मतदार संघातील मतदारांनी आमदारांना तोंडघशी पाडल्याची चर्चा बेळगाव मध्ये रंगत आहे.
अंतिम आकडेवारीची उत्सुकता!
बेळगाव लोकसभा मतदार संघावर भाजपचेच वर्चस्व अबाधित!
चिक्कोडीत फासे पलटले, नवख्या उमेदवाराला चिक्कोडीकरांची पसंती!
कर्नाटकात हमी योजनांचा करिष्मा कमी! भाजपने राखली आघाडी!
भाजप १६, काँग्रेस ९, जनता दलाची २ जागांवर आघाडी…
देशपातळीवर निर्णायक घडामोडींना सुरुवात!