बेळगाव लाईव्ह :पावसाळ्याला प्रारंभ झाला आहे, या पार्श्वभूमीवर यंदे खूट ते हिंडलगा श्री गणेश मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांच्या धोकादायक फांद्या तात्काळ हटविण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
गेल्या एक-दोन वर्षांपासून पावसाळ्यामध्ये सोसाट्याचा वारा व पाऊसामुळे झाडाच्या फांद्या तुटून अचानक रस्त्यावर कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. यापैकी कांही घटनांमध्ये कांही वाहन चालकांना विशेष करून दुचाकी वाहनचालकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.
सध्या यंदे खूट ते हिंडलगा श्री गणेश मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांपैकी कांही झाडांच्या फांद्या धोकादायक अवस्थेत खाली कलल्या आहेत. वादळी वारा व पावसामुळे या फांद्या केव्हा कोसळतील याची शाश्वती देता येत नाही.
तेंव्हा बेळगाव महापालिका व कँटोन्मेंट बोर्डाने संबंधित झाडांच्या रस्त्यावर कोसळण्याच्या स्थितीत असलेल्या फांद्यांची वेळीच गांभीर्याने दखल घ्यावी.
तसेच सदर फांद्या तात्काळ हटवून रस्ता रहदारीसाठी सुरक्षित करावा, अशी जोरदार मागणी सदर रस्त्याचा वापर करणारे वाहनचालक आणि पादचाऱ्यांकडून केली जात.