बेळगाव लाईव्ह :राजस्थान मधील वाल्मिकी -मेहतर या मागास समुदायातील रामेश्वर वाल्मिकी या निष्पाप युवकाच्या खुनास कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे करण्यात आली आहे.
ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसचे कर्नाटक राज्य अध्यक्ष काशीराम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना धाडण्यासाठी आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर हकरण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी निवेदनाचा स्वीकार करून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. राजस्थान मधील सुरतगड झुंझुनू जिल्ह्यातील वलोडा गावातील रामेश्वर वाल्मिकी या वाल्मिकी -मेहतर समुदायातील युवकाचा गेल्या 14 मे 2024 रोजी काही समाजकंटकांनी हल्ला करून निर्घृण खून केला.
मयत युवक हा अतिशय गरीब कुटुंबातील असून तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता. सदर अत्यंत गर्हणीय निंद्य घटनेचा कर्नाटकातील दलित समुदायाचे लाखो तीव्र निषेध करत असून निष्पाप दलित तरुणांचा खून करणाऱ्या संबंधित गुन्हेगारांना तात्काळ गजाआड केले जावे तसेच त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जावी याखेरीस मयत युवकाच्या आईला मदत निधी उपलब्ध करून द्यावा.
संबंधित भागातील मागासवर्गीयांना संरक्षण देण्यात यावे सरकारने याची गंभीर दखल घेऊन अशा घटना रोखण्यास त्वरित खडक उपाय योजना कराव्यात अशा आशियाचा तपशील राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात नमूद आहे निवेदन सादर करतेवेळी संघटनेचे अध्यक्ष काशीराम चव्हाण यांच्यासह दीपक मेत्री, श्रीनिवास तळवार, मुरली चव्हाण परशुराम हरिजन, कल्लाप्पा चौगुले, रुबीन पेरकी आदी उपस्थित होते.