Monday, January 27, 2025

/

प्रियांका जारकीहोळी यांनी घेतले उपमुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद

 belgaum

बेळगाव लाईव्ह:चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रियांका जारकीहोळी यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची त्यांच्या सदाशिवनगर बेंगलोर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन स्वीकारून त्यांचे आशीर्वाद घेतले.

अभिनंदन करून प्रियांका जारकीहोळी यांना आशीर्वाद देताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी अतिशय तरुण वयात खासदार झाल्याबद्दल प्रियांका यांची प्रशंसा करून त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच प्रियांका यांना थोडक्यात राजकारणाचा पाठ शिकवताना सदनात कायम हजर राहण्याचा आणि सर्व कलापांमध्ये श्रद्धापूर्वक सक्रिय राहण्याचा सल्ला दिला.Satish priyanka

 belgaum

तसेच संसदेत खासदार या नात्याने आपण आपल्या राज्याच्या हिताचा कसा विचार करायला हवा, याबाबतही उपमुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, बेळगाव बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, आमदार श्याम घाटगे, युवा नेते राहुल जारकीहोळी, केपीसीसी सरचिटणीस महावीर मोहिते आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.