बेळगाव लाईव्ह :रहदारी पोलिसांकडून बॅरिकेट्स वर ‘वन-वे’ चे फलक लावून बेळगाव शहरात एकेरी मार्गाच्या (वन-वे) नियमाची काटेकोर अंमलबजावणी सुरू झाली असून नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर थेट कारवाई केली जात आहे.
बेळगाव शहरातील 8 मार्गांवरील एकेरी वाहतुकीबाबत सूचना करण्यात आली असून एकेरी मार्गाच्या नियमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
यासाठी संबंधित मार्गाच्या ठिकाणी वन-वे चे चिन्ह असलेले बॅरिकेड टाकण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे रहदारी पोलीस वन-वे नियमाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेताना दिसत आहेत.
शहरातील संबंधित 8 एकेरी मार्गांवर नियम मोडून विरुद्ध दिशेने संचार करणाऱ्यांवर रहदारी पोलिसांकडून थेट कारवाई केली जात आहे. शहरातील आठ एकेरी मार्ग (वन-वे) पुढील प्रमाणे आहेत.
1) किर्लोस्कर रोड (धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून कडोलकर गल्लीच्या दिशेने), 2) केळकर बाग (श्री दत्त मंदिरापासून रामदेव गल्लीच्या दिशेने), 3) अनसुरकर गल्ली (रामलिंग खिंड गल्ली पासून मारुती गल्ली कॉर्नरच्या दिशेने),
4) रामदेव गल्ली (हुतात्मा चौकापासून संयुक्त महाराष्ट्र चौकाच्या दिशेने), 5) गणपत गल्ली (मारुती गल्लीपासून काकती वेसच्या दिशेने), 6) कलमठ रोड (फोर्ट रोडपासून रविवार पेठच्या दिशेने), 7) नेहरूनगर सेकंड क्रॉस (तट्टे इडली कॉर्नर), 8) नेहरूनगर थर्ड क्रॉस (मुजावर आर्केड).