बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण समितीसह त्यांचे लोकप्रतिनिधी आणि समर्थकांच्या पाठिंबामुळेच बेळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठ्या मत फरकाने विजय संपादन करता आला आहे, अशी प्रांजळ कबुली भाजपनेते महांतेश कवटगीमठ यांनी दिली.
शहरात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, श्रीमती सुतार तसेच भाजप आणि निजदचे अन्य पदाधिकारी व काय कार्यकर्त्यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमामुळे आम्हाला बेळगाव मतदार संघात विजय मिळवता आला.
ते पुढे म्हणाले की विशेष करून महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच बेळगावचे समस्त माजी महापौर, नगरसेवक आणि इतकी वर्ष महाराष्ट्र एकीकरण समितीचे म्हणून कार्य करणाऱ्या सर्वांनी राष्ट्रीयत्वासाठी नरेंद्र मोदी यांना आपला नेता मानून भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला.
बेळगाव उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप सुमारे 1 लाख 25 हजार इतक्या मोठ्या मतांच्या आघाडीने विजयी झाला, अशी माहिती महांतेश कवटगीमठ यांनी पुढे दिली
. पत्रकार परिषदेस भाजपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.