बेळगाव लाईव्ह : वडगाव येथे होणाऱ्या श्री मंगाई देवी यात्रेमध्ये पशुबळी देण्यास बंदी घालण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी शुक्रवारी जारी केला असून या आदेशाचे उल्लंघन करून पशुबळी देणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
श्री मंगाई देवी यात्रा काळात मंदिरा आवारात आणि वडगाव परिसरात मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या यासारख्या पशूंचा मोठ्या प्रमाणात बळी देण्यात येतो. या पार्श्वभूमीवर वडगाव श्री मंगाई यात्रेत होणारी प्राण्यांची हत्या थांबवावी
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी विश्वप्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष श्री दयानंद स्वामी यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त आदेश बजावला आहे.
आपल्या मागणी संदर्भात बोलताना श्री दयानंद स्वामी मनाली की, कर्नाटक पशु बळी प्रतिबंधक कायदा 1959 व नियम 1963 नुसार पशुबळी प्रतिबंध करणे आवश्यक आहे. श्री मंगाई देवी यात्रेच्या निमित्ताने भाविकांकडून मंदिर व वडगाव परिसरात मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा बळी दिला जातो ही हत्या थांबली पाहिजे.
उचगाव येथील श्री मळेकरणी मंदिराच्या आवारात होणारी प्राणी हत्या ग्रामस्थांनी थांबवली. त्याचप्रमाणे भडगाव येथील भाविकांनी ही निर्णय घ्यावा असे आवाहन करून जिल्हा प्रशासनाने देखील ही पशुहत्या थांबवावी, अशी आपली मागणी असल्याचे स्वामीजींनी सांगितले