Sunday, December 22, 2024

/

मच्छेतील या महिलांची अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा

 belgaum

बेळगाव लाईव्ह :जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी शुक्रवारी तालुक्याच्या विविध गावांमध्ये सुवासिनी महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली.

मात्र मच्छे गावातील काही महिलां दरवर्षी वेगळ्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करत असतात.

यावर्षी सुद्धा त्या महिलांनी शुक्रवारी दिवसभर गावातील वेगवेगळ्या ठिकाणी वटपौर्णिमेनिमित्त ठेवण्यात आलेली फळे एकत्र जमा केली, तसेच पूजेसाठी येणाऱ्या महिलांना, वृक्षारोपण व वटवृक्षाचे तसेच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले.

त्यांच्या या समाज प्रबोधनात्मक कार्यामुळे बऱ्याच अंशी सकारात्मक बदल महिलांमध्ये घडून येत आहे असे दिसून येत आहे.त्या महिलांनी प्रसाद रुपी वटवृक्षा समोर ठेवलेले आंबा केळी पेरू धामण करवंद जांभूळ चिकू आधी रानमेवा सह विविध प्रकारची फळे संकलित केली. संकलित केलेली फळे मच्छे गाव व परिसरातील भुकेल्या गरजू लोकांना वितरित करण्यात आली.Machhe

आपल्या समाजामध्ये बऱ्याच प्रथा परंपरा प्रचलित आहेत.त्या परंपरा जोपासताना आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अन्न हे संपूर्ण परब्रम्ह समजून, त्याची कोणतीही विटंबना होऊ नये.ते अन्न गरजूंना उपयोगी व्हावं हा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे.असा संदेश त्यांनी या विधायक कार्यातून दिलेला आहे.

मालती मालोजी लाड, रमा श्याम बेळगावकर, विना गजानन छप्रे, रेखा जयपाल लाड, रूपा वासुदेव लाड, प्रियांका बजरंग धामणेकर, यांनी हा उपक्रम राबविला आहे.हा उपक्रम राबवण्यासाठी ॲम्बिशन युथ अकॅडमीच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.