बेळगाव लाईव्ह :आरोग्याच्या जोखमीमुळे व्हेज, चिकन आणि फिश कबाबमध्ये सनसेट यलो आणि कार्मोइसिन हे सिंथेटिक रंग वापरण्यास नव्या नियमानुसार प्रतिबंध घालण्यात आला आहे.
कलर कँडी, गोबीमंचुरियनमध्ये कृत्रिम रंगांवर बंदी घातल्यानंतर कर्नाटक सरकारने आता कबाबमध्येही कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी घातली आहे. व्हेज, मासे आणि चिकन कबाबमध्ये सनसेट यलो व कार्मोइसिन वापरून नियम उल्लंघन केल्यास 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
राज्यभरात विकल्या जाणाऱ्या व्हेज, चिकन व माशांच्या (फीश) कबाबासह इतर कबांबमध्ये कृत्रिम रंग घातल्याने ग्राहकांच्या म्हणजे जनतेच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन कबाब तयार करताना कृत्रिम रंग वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
राज्यात विकल्या जाणाऱ्या कबाबचा दर्जा कृत्रिम रंगामुळे निकृष्ट होत असून त्यामुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. या संदर्भात प्रसारमाध्यमांतून आणि जनतेकडून आलेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात विकल्या जाणाऱ्या कबाबचे नमुने गोळा करून राज्याच्या प्रयोगशाळांमध्ये त्याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
राज्यभरातून 39 कबाबचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवले असता 8 नमुने (सनसेट यलो 07 नमुने आणि सनसेट यलो आणि कार्मोसिन 01 नमुने) कृत्रिम रंगामुळे असुरक्षित असल्याचे आढळले असल्याचे अन्न सुरक्षा आणि मानकं कायदा 2006 च्या नियम 3(1)(zz) (viii) नुसार विश्लेषण अहवालात नोंदवले गेले आहे. कृत्रिम रंग वापरकर्त्याच्या आरोग्यावर गंभीरपणे परिणाम करू शकतात. त्यामुळे अन्न सुरक्षा आणि मानकं (अन्न उत्पादने मानके आणि अन्न जोडणारे) कायदा 2011च्या कलम 8 2 16.0 नुसार कोणतेही कृत्रिम रंग वापरले जाऊ नयेत.
या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा आणि मानक कायदा -2006 2 2 3 (1)(zz)(viii) तसेच अन्न सुरक्षा आणि मानके नियम -2011 च्या नियम 16.0 अंतर्गत कबाब तयार करताना कोणत्याही कृत्रिम रंगांचा वापर करण्यास परवानगी नाही.
सुरक्षा आणि गुणवत्ता कायदा-2006 च्या नियम 30(2)(अ) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करताना व्हेज, चिकन, मासे इतर कबाब तसेच शाकाहारी पदार्थ तयार करताना कोणत्याही कृत्रिम रंगांचा वापर करण्यास मनाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता कायदा-2006 च्या नियम 59 चे उल्लंघन झाल्यास उत्पादकाला 7 वर्षाच्या जन्मठेपेसह 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.